आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य विमा : वैद्यकीय खर्चासह प्राप्तिकरात सवलत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विविध आजारांवरील उपचारांसाठी झालेल्या खर्चासाठी प्राप्तिकर कायदाच्या कलम ८० डी आणि ८० डीडीबी अंतर्गत कर सवलत मिळते. या कलमाअंतर्गत किती रकमेपर्यंत कर सवलत मिळते याबाबत नेमकी माहिती प्रत्येकाला असतेच असे नाही. आरोग्य विमा आणि रुग्णालयात भरती झाल्यानंतर होणाऱ्या खर्चावरही कर सवलत कशी मिळते.

८० डी कलमातील विविध तरतुदी: प्राप्तिकर कायद्याच्या ८० डी अंतर्गत स्वत:च्या किंवा कुटुंबीयांच्या वैद्यकीय खर्चावर २५ हजारांपर्यंत करसवलत मिळणे शक्य आहे. याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी ३० हजार रुपयांपर्यंतची सवलत मिळते.

औषधी, डॉक्टरच्या फीसाठी सवलत: डॉक्टरांना देण्यात आलेली फी आणि औषधांवर झालेल्या खर्चाचाही प्राप्तिकराच्या सवलतीत दावा करता येतो. समजा तुम्ही नोकरी करता आणि वैद्यकीय खर्चाचा दावा करत नसाल, तर नियोक्त्यामार्फतही रक्कम मिळेल मात्र कर कपात होऊन, मात्र, हा दावा करताना डॉक्टरांचे प्रमाणपत्र व मेडिकल बिल हवे.

तपासणीवरही कर लाभ: प्रिव्हेन्टिव्ह हेल्थकेअरवर करण्यात येणाऱ्या खर्चावरही कर सवलतीची तरतूद आहे. एखादी व्यक्ती किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रिव्हेन्टिव्ह आरोग्य तपासणीसाठी ५००० रुपयांपर्यंतच्या खर्चावर कर सवलतीचा क्लेम केला जाऊ शकतो.

प्रिव्हेन्टिव्ह हेल्थकेअरअंतर्गत एखाद्याने त्याची किंवा कुटुंबातील सदस्याची वैद्यकीय चाचणी एखाद्या रुग्णालयात केली तर त्यावर होणारा खर्च क्लेममध्ये नमूद करून कर सवलत मिळवता येते. प्रिव्हेन्टिव्ह हेल्थकेअरअंतर्गत मिळणारी ५००० रुपयांची कर सवलत कलम ८० डी अंतर्गत मिळते आणि त्याची मर्यादा १५,००० रुपये आहे.

उपचारांसाठी अधिक कर लाभ : समजा एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबातील
सदस्याला कॅन्सर, एड्स, न्यूरोलॉजिकल आजार, क्रॉनिक रिनल फेल्युअर, हिमोफिलिया किंवा थॅलेसेमियासारखे आजार आहेत तर त्यावरील उपचारासाठी होणाऱ्या ४० हजार रुपयांपर्यंतचा खर्च प्राप्तिकर सवलतीसाठीच्या क्लेममध्ये करता येतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खर्च मर्यादा ६० हजार रुपयांपर्यंत आहे. प्राप्तिकरात ही सवलत कलम ८० डीडीबी अंतर्गत मिळते, तर ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी ८० हजार रुपये आहे.

अपंगावरील उपचारांवर कर सवलत: कुटुंबातील एखादा सदस्य अपंग असेल, तर त्यावर होणाऱ्या उपचारासाठी येणाऱ्या खर्चावरही प्राप्तिकरात सवलत मिळते. समजा एखादा सदस्य शारीरिकदृष्ट्या अपंग असेल तर वैद्यकीय उपचार यात नर्सिंग, ट्रेनिंग आणि त्यावरील उपचार यांचा यात समावेश आहे. त्यासाठी ५० हजार ते एक लाखापर्यंतचा खर्च क्लेम करता येतो. करदात्याला हा लाभ डिडक्शनच्या रूपात मिळतो. क्लेमची रक्कम अपंगत्वाच्या प्रमाणावर अवलंबून असते.

८० डी अंतर्गत कमाल सवलतीच्या तरतुदी
घटक आरोग्य विमा हप्ता आई-वडिलांसाठी हप्ते ८० डी अंतर्गत
(स्वत:, पत्नी व मुले) (अवलंबितांसाठी) एकूण कर सवलत
एकाही व्यक्तीचे वय १५,००० रुपये १५,००० रुपये ३०,००० रुपये
६० वर्षांपेक्षा जास्त नसावे
कुटुंबीय ६० वर्षांपेक्षा कमी १५,००० रुपये २०,००० रुपये ३५,००० रुपये
आणि पालक ६० पेक्षा
स्वत: आणि पालक जास्त २०,००० रुपये २०,००० रुपये ४०,००० रुपये
६० वर्षांपेक्षा जास्त
बातम्या आणखी आहेत...