आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Service Leaves For Sickness Region Get Money To Health Scheme

आजारपणामुळे नोकरी गेली तर योजना देईल रक्कम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या देशात नोकरदार महिलांमध्ये सुमारे दोन तृतीयांश महिलांना कोणता ना कोणता आजार असतो. जर एखाद्या महिलेची गंभीर आजारामुळे नोकरी गेली तर तिला अतिरिक्त लाभ मिळतात. बहुतांश महिलांना अशा प्लॅन्सची माहिती नसते. जाणून घेऊया...

शांभवी एका खासगी बँकेत १२ वर्षांपासून नोकरी करते. एमबीए झाल्यानंतर फॉरेक्स डिपार्टमेंटमध्ये जनरल मॅनेजर आहे. तिच्यासोबत काम करणारी चारू काही दिवसांपूर्वी एका मीटिंगमध्ये बेशुद्ध पडली होती. तिला दवाखान्यात नेण्यात आले. शांभवी तिच्यासोबत बसली होती. मेडिक्लेमनंतरही चारूला सर्व खर्चाचा भार उचलू शकेल का, याची चिंता होती. कारण तिच्या घराच्या कर्जाचे हप्ते चालू होते. मुलगा शंतनूचे उच्च शिक्षण सुरू होते. डॉक्टरांनी चारूला थोडाही मानसिक ताण सहन होणार नाही, असे बजावले होते. चारू बरी झाली तेव्हा शांभवीने तिच्या आर्थिक नियोजनासाठी एका अार्थिक नियोजन सल्लागारास बोलावले. बाजारात असे अनेक प्रॉडक्ट आहेत, जे केवळ महिलांसाठीच तयार करण्यात आलेले आहेत.

जीवन विमा : जर कुणा नोकरदार महिलेचा मृत्यू ओढवल्यास तिच्यासाठी काही विशेष प्रॉडक्ट आहेत. एचडीएफसी लाइफ स्मार्ट वुमन प्लॅन हे असेच प्राॅडक्ट आहे. हा युलिप प्लॅन असून गुंतवणुकीचे विविध पर्याय आहेत. यात कमी जोखमीपासून जास्त जोखमीचे पर्याय निवडू शकता. महिलांच्या विशेष गरजा लक्षात घेता यात तीन अतिरिक्त लाभही समाविष्ट करण्यात आले आहेत.

१. गर्भावस्थेत जर प्रकृती गंभीर झाली आणि मुलास काही डिसऑर्डर झाल्यास सुविधा मिळू शकते.
२. महिलांना कॅन्सरचे निदान झाल्यास त्यातही लाभ मिळू शकतो.
३. पतीचा मृत्यू झाल्यास.

एचडीएफसी लाइफमध्ये क्लिक २ प्रोजेक्ट प्लॅनसुद्धा आहे. हा एक टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे. यात कमी प्रीमियमवरही विमा मिळतो.

आरोग्य विमा : कोणत्याही महिलांसाठी आरोग्य विमा आणि गंभीर आजारासाठी सुरक्षा मिळण्याची गरज असते. त्यात प्रामुख्याने खालील सुरक्षा समाविष्ट आहेत.

बाळंतपणाची सुरक्षा : आई होताना महिलांना याची आवश्यकता जास्त असते. ज्या महिला आई बनून त्यांचे कुटुंब तयार करत असतात त्यांच्यासाठी अपोलो, रेलिगेअर, मॅक्स, ब्रूपा आणि आयसीआयसीआय लोम्बार्डसारख्या विमा कंपन्या बाळंतपणात विमा सुविधा देतात. यात प्रतीक्षा कालावधीचीच तुलना करू शकता. कारण प्रत्येक कंपनीचा प्रतीक्षा कालावधी कुणाचा तीन तर कुणाचा चार वर्षांचा असतो. रेलिगेअरमध्ये ९ महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. याशिवाय बाळंतपणाच्या खर्चात थोडाफार फरकही असतो.

महिलांचे आजार : प्रत्येक व्यक्तीसाठी आरोग्य विमा वेगवेगळा असतो. नोकरदार महिलांना ग्रुप हेल्थ इन्शुरन्समध्ये सहभागी करून घेता येते. शिवाय वेगळे हेल्थ कव्हर असते. वेल इन्शुरन्स वुमन पॉलिसी टाटा एआयजीने तयार केली आहे, तर मॅक्स ब्रूपाने हार्ट बीट नावाची पाॅलिसी ठेवली आहे.

गंभीर आजारावर सुविधा : बजाज अालियान्झने महिलांच्या गंभीर आजारावर आरोग्य विमा सुविधा दिल्या आहेत. यात ८ अाजारांचा समावेश आहे. स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कॅन्सर, व्हेजिनल कॅन्सर, सर्व्हिकल कॅन्सर, बर्न, युटेरिन अँडामेट्रियल कॅन्सर फेलोपियन ट्यूब कॅन्सर, लकवा आणि मल्टिट्रॉमा इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय या प्लॅन्समध्ये मुलांना शैक्षणिक बोनससारखा लाभ मिळतो. आजारपणात महिलेस नोकरी सोडावी लागली तर या विम्याअंतर्गत ठरावीक रक्कम मिळू शकते.

गुंतवणूक प्रॉडक्ट : काही कंपन्यांनी महिलांसाठी जीवन िवमा, निवृत्ती, मुलांचे शिक्षण यांना एकत्रित प्लॅन दिला आहे. एलआयसीची जीवन भारती योजना आहे. यानंतर चारुला सुयोग्य पॉलिसी देण्यात आली.
(फायनान्शियल प्लॅनर्स गिल्ड ऑफ इंडियाच्या सदस्य)