मायनिंग वा खाणी नॉन मेटॅलिक, विभिन्न प्रकारचे अयस्कों, ठोस खनिजे आणि कोळसा वा न्यूक्लिअर मटेरियलसारख्या ऊर्जेच्या स्रोतांना पृथ्वीतून खोदून काढण्याची प्रक्रिया आहे. मायनिंग इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंगची एक शाखा आहे, ज्यात बहुमूल्य व उपयोगी क्षार पृथ्वीतून काढण्याच्या पद्धती व त्याच्या उपयोगाच्या प्रक्रियेचे अध्ययन केले जाते.
यात मायनिंगचे सर्व टप्पे अन्वेषण, शोध, शक्यतांची तपासणी पडताळणी, विकसन, उत्पादन आणि प्रक्रिया सर्व काही समाविष्ट आहेत. एका अनुमानाच्या अनुसार देशाच्या खाण उद्योगात जवळपास ७ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. सामान्य जीवनात उपयोग होणारी जवळपास ७० टक्के वस्तू आमच्यानंतर उत्खननानंतर पोहोचवली जातात.
खाणकाम तंत्रज्ञानाच्या बदलाने आणि उत्पादकतेसाठी यंत्रांचा उपयोग वाढल्याने नवी कौशल्ये असणाऱ्या व्यावसायिकांची मागणी देखील वाढली आहे. अशात हा युवकांसाठी रोजगाराचा उत्तम मार्ग होऊ शकतो. मायनिंग इंजिनिअर खनिजाच्या नैसर्गिक साठ्यांना भूगर्भशास्त्रज्ञांच्या मदतीने शोधणे, त्यास सुरक्षित काढणे आणि संबंधित समस्यांना सोडविण्याचे काम करतात. तथापि जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असू शकतात. काही खाण अभियंते भूगर्भशास्त्रज्ञ आणि धातूशास्त्र अभियंत्यांसह मिळून नव्या साठ्यांचा शोध घेण्याचे काम करतात. काही खाण अभियंते मायनिंगमध्ये निर्माण, आरेखन आणि तळघरातील माइन्स व सुरंगांना सुपरवाइज करण्याचे काम करतात.
देशासह विदेशातही संधी
मायनिंग इंजिनिअरसाठी या क्षेत्रात विदेशांतही नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. हे व्यावसायिक पेट्रोलियम मायनिंग, कोल मायनिंग या व अन्य मायनिंग कंपन्या, मायनिंग फायनान्स हाउसेस, संशोधन संस्था, मिनरल उत्पादन फर्म आणि या प्रकारच्या अन्य संस्थांमध्येही काम करू शकता.
पात्रता, योग्यता
विज्ञान शाखेतून बारावी करणारे विद्यार्थी मायनिंग अभियांत्रिकीतील पदवी कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. बारावीत फिजिक्स, केमिस्ट्री व गणित विषय गरजेचा आहे. बारावीनंतर विद्यार्थी जेईई मेनच्या माध्यमातून देशभरातील विविध संस्थांमध्ये मायनिंग इंजिनिअरिंगच्या बीई वा बीटेक कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात. काही संस्था स्वत:ची प्रवेश चाचणी आयोजित करतात. याशिवाय विद्यार्थी मायनिंग इंजिनिअरिंगच्या पदविका कोर्सलाही प्रवेश घेऊ शकतात. खाण अभियांत्रिकीच्या एमटेक कोर्समध्ये प्रवेशासाठी संबंधित शाखेत बीई वा बीटेक आणि गेटचा व्हॅलीड स्कोअर गरजेचा असतो.
उत्पन्न
फ्रेशरला २० ते २५ हजार रुपये मासिक पॅकेज मिळण्याची शक्यता असते. तथापि संस्था आणि अनुभवाच्या आधारावर वेतन पॅकेज वेगवेगळे असू शकतात. काही वर्षांच्या अनुभवानंतर वार्षिक पॅकेज ६ ते ७ लाख रुपये होण्याची शक्यता असते.
मुख्य संस्था
{ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर.
www.iitkgp.ac.in/
{ आयआयटी-बीएचयू, वाराणसी. www.iitbhu.ac.in/
{ आयएसएम, धनबाद.
www.iitism.ac.in/
{ एनआयटी, सुरतकल.
www.nitk.ac.in/