आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरमध्ये सोयाबीनला २९०० रुपयांचा भाव; दरवाढही शक्य, गेल्या पंधरा दिवसांपासून दरात सुधारणेची नोंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली असून मंगळवारी ३५ हजार क्विंटल माल विक्रीला आला होता. सध्या सोयाबीनला कमी भाव मिळत असला तरी भविष्यात त्यात वाढ होण्याची शक्यता येथील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

लातूर जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनचा पेरा केला जातो. त्यामुळे यंदा चार लाख हेक्टर्सपेक्षा जास्त रानावर हे पीक व्यापले होते. सोयाबीनसाठी येथील बाजारपेठ देशभरात प्रसिद्ध आहे. यंदा ऐन काढणीच्या वेळी अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन प्रभावित झाले होते. उत्पादित माल काळा पडल्याने व त्यात ओलावा असल्याने भावात मोठी घसरण झाली आहे.

हंगामाच्या सुरुवातीला डॅमेज सोयाबीन प्रति क्विंटल दोन हजारांच्या खाली, तर उत्कृष्ट दर्जाच्या मालाला २७०० रुपयांचा भाव मिळाला होता. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून दरात सुधारणा होत आहे. मंगळवारी ३५ हजारांची आवक असताना िकमान भाव २३००, तर कमाल २९०० रुपये होता. काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सतत वाढ होत असल्याने भविष्यात त्याच्या दरात वाढ होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

जगातील अनेक देशांत सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे त्याला जागतिक मार्केट आहे. परिणामी, डॉलरच्या मूल्यानुसार त्याचा भाव ठरवला जातो. तसेच जागतिक उत्पादन आणि मागणी ही कारणेही त्यामागे आहेत.

स्थिर भाव ३५००
गेल्या चार वर्षांच्या काळात सोयाबीनच्या दरात मोठे चढउतार झाले आहेत. त्या वेळेचा विचार केल्यास, या चार वर्षांच्या दरम्यान कमाल भाव ४९००, तर किमान २७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली घसरला आहेत. परंतु स्थिर भाव ३५०० रुपयांच्या जवळपास राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांन किमान साडेतीन हजारांची तरी अपेक्षा असते. सध्या हाही भाव मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे.

भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता
^काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सतत वाढ होत आहे. त्यामुळे भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु ते िकतीपर्यंत वाढतील, हे नक्की सांगता येणार नाही. जागतिक बाजाराच्या दिशेवर भाव ठरतील. -अशोक अगरवाल, आडत व्यापारी, लातूर.

बाजार समितीचीे शेतमाल तारण योजना
बाजारात सोयाबीनच्या दरात चढउतार होत असल्याने लातूर जिल्ह्यातील तसेच परिसरातील शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व त्यांनाही तेजीमंदीचा फायदा मिळावा म्हणून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतमाल तारण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना त्या दिवशीच्या चालू बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम केवळ सहा टक्के व्याजदराने ६ महिन्यांच्या कालावधीकरिता उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे मत येथील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
बातम्या आणखी आहेत...