आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पैसा अॅडजस्ट नाही झाला तर २७% तरुण कोर्ट मॅरेजच्या तयारीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी चलनातील ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा अवैध ठरवल्या. या निर्णयावर देशभरात उलटसुलट प्रतिक्रिया उठल्या. याबाबत जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी नरेंद्र मोदी अॅपवर २३ नोव्‍हेंबर रोजी ९ प्रश्न असणारे ‘जन जन की बात’ हे सर्वेक्षण करण्यात आले होते. ५ लाख नागरिकांनी यात भाग घेतला. ९३ टक्के नागरिकांनी पंतप्रधानांचा नोटबंदीचा निर्णय योग्य ठरवला. या सर्वेक्षणापूर्वी नोटबंदीबाबत झालेल्या तीन देशव्यापी सर्वेक्षणांतून नागरिकांनी सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे.
या सर्वेक्षणाचे निकालही नोटबंदीच्या निर्णयाच्या बाजूनेच आहेत
सर्वेक्षण क्रमांक १ | शादी डॉट कॉम : तरुणाईचा पाठिंबा

ऑनलाइन विवाह जुळवणाऱ्या शादी डॉट कॉम वेबसाइटच्या २३ तारखेच्या सर्वेक्षणात नाेटबंदीचा विवाहांवर परिणाम झाला नसल्याचे समोर आले आहे. यात २५ ते ३२ वयोगटातील १३,२०० विवाह जुळलेल्या तरुणांना प्रश्न विचारण्यात आले. ४१ टक्के मुले तर ३९ टक्के मुलींनी हातात खेळता पैसा नसल्यामुळे विवाहाच्या नियोजनावर काहीच परिणाम झाला नसल्याचे सांगितले. मात्र २०.३ मुले आणि २४.५ मुलींनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे शॉपिंगवर परिणाम झाल्याचे सांगितले. ३७ टक्के विवाहोत्सुकांच्या मते त्यांनी विवाहाच्या खर्चाचे कंत्राट आधीच दिले असून पुढील जबाबदारी इव्हेंट कंपन्यांची आहे. ३५ टक्के विवाहोत्सुकांनी खर्चात कपात करून लग्न करण्याची तयारी दर्शवली. २७ टक्के तरुण पैसा अॅडजस्ट नाही झाला तर कोर्ट मॅरेज करण्याच्या तयारीत आहेत. १७.८ मुले आणि ७.६ मुलींनी नगदी पैसा नसल्याने विवाह रद्द केल्याचे सांगितले.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून सर्वेक्षणाविषयी आणखी माहीती
बातम्या आणखी आहेत...