आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी प्रणाली: प्राप्तिकर परतावा घेणे अाता अधिक सोपे होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कर परताव्यामध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी प्राप्तिकर विभाग नवीन प्रणाली उपयोगात आणणार आहे. प्राप्तिकर विभागाच्या मुख्य आयुक्त (टीडीएस) नूतन शर्मा यांनी मंगळवारी असोचेमच्या कार्यक्रमात ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, ही नवीन प्रणाली टीडीएस आकलन अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. लवकरच ती वापरात येईल. जुनी कर प्रकरणे निकाली काढण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाशी (सीबीडीटी) चर्चा सुरू आहे. लवकरच ती मार्गी लागतील.

अनेक कंपन्या-विभाग टीडीएस कापून घेतात, मात्र सरकारकडे जमाच करत नाहीत. त्यावर तोडगा काढण्याबाबत प्राप्तिकर विभाग असहाय आहे.
त्यावर आजवर केलेल्या उपायांना यश आलेले नाही. कायदेशीर कारवाई करूनही ते कर सरकारी तिजोरीत जमा करत नाहीत. कारवाई करणे हे आमचे ध्येय नसून टीडीएस गोळा करणे हेच ध्येय आहे, असेही शर्मा म्हणाल्या.
बातम्या आणखी आहेत...