आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LIC पॉलिसीवर स्वस्तात मिळेल लोन, ही आहे सोपी प्रोसेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय जीवन विमा निगमची पॉलिसी केवळ भविष्यात रक्कम मिळण्यासाठी राहत नाही तर लोन घेण्यासाठीही कामी येते. विमा पॉलिसीला प्रोटेक्टिव्ह कव्हर समजले जाते. पण विमा, कव्हरेज, गुंतवणूक, कर लाभ आणि लोन सुविधा याच्या माध्यमातून मिळत असते. बऱ्याच लोकांना माहिती नसते, की पॉलिसीवर लोनही घेता येऊ शकते. केवळ व्यक्तिगत कमाईवर लोन घेता येते अशीच धारणा लोकांची असते. यामुळे ते याचा पुरेपुर लाभ घेऊ शकत नाहीत.

 

विमा पॉलिसीवर कसे मिळेल लोन
सध्याच्या परिस्थितीत सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बॅंक, विमा पॉलिसीवर लोन देतात. या लोनची अमाऊंट पर्सनल लोनसारखीच कमी असते. पण आयत्या वेळी ते कामी येते. हे लोन घेताना विमा पॉलिसी गॅरंटीसाठी गहाण ठेवावी लागते.

 

कोणत्या पॉलिसीवर मिळेल लोन
सर्व प्रकारच्या विमा पॉलिसीवर लोन मिळत नाही. भारतीय जीवन विमा योजनेच्या अॅंडोर्समेंट प्लॅन अंतर्गत लोन दिले जाते. यावर कोणतीही बॅंक लोन द्यायला तयार असते. यात तुम्ही हेही करु शकता, की लोन आणि व्याजाची इन्स्टॉलमेंट न देता केवळ व्याजाची रक्कम चुकती करुन अखेर विमा पॉलिसीच्या रमकेतून पैसे कापायला लावू शकता.

 

पुढील स्लाईडवर वाचा... पॉलिसीवर लोन घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज असते...

बातम्या आणखी आहेत...