आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या 24 तासांत ट्रान्सफर होईल PFची रक्कम, अॅक्टिवेट करावा लागेल UAN

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ईपीएफओ (EPFO) म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 'यूनिव्हर्सल अकाउंट नंबर' (UAN) धारकांसाठी पीएफ ट्रान्सफरची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. यासाठी खातेदारांना आधी आपला UAN अॅक्टिवेट करावा लागेल. यूएएन अॅक्टिवेट झालेल्या खातेदारांसाठी ईपीएफओने 'फॉर्म 11' देण्यात आला आहे. ईपीएफओने ही व्यवस्था लागू केली आहे.

यापूर्वी एका संस्थेतून दुसर्‍या संस्थेत पीएफची रक्कम ट्रान्सफर करण्‍यासाठी 'फॉर्म 13' भरावा लागत होता. या संपूर्ण प्रक्रियेला किमान 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागत असे. मात्र, आता 'फॉर्म 11' भरून अवघ्या 24 तासांत पीएफची रक्कम ट्रान्सफर करता येईल.
UAN च्या माध्यमातून सहज होईल PF ट्रान्सफर...
UANच्या माध्यमातून खातेदार अकाउंट बॅलेंस चेक करण्यासोबतच पासबुक आणि UAN कार्ड देखील डाउनलोड करू शकतो. इतकेच नव्हेतर आता पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी UAN क्रमांक आवश्यक असेल. यामुळे PF ट्रान्सफरच्या पूर्ण प्रक्रियेला अवघे 24 तासांत रक्कम अकाउंटवर ट्रान्सफर होईल. परंतु, बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना UAN क्रमांक दिलेला नाही.

या पॅकेजमधून आम्ही आपल्याला UAN क्रमांकाविषयी माहिती देत आहोत. UAN क्रमांक मिळाला आहे की नाही, तसेच UAN अॅक्टिवेट करण्यासाठी काय करावे याविषयीही माहित देत आहोत...
UAN स्टेटस असे माहीत करावे...
UAN स्टेटस माहीत करून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे... http://uanmembers.epfoservices.in/check_uan_status.php
यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल. त्यावर मागितलेली सर्व माहिती भरावी. यात राज्याचे नाव, शहराचे नाव, इस्टेबलिशमेंट कोड आणि पीएफ अकाउंट नंबर भरावा. 'चेक स्टेटस बटन'वर क्लिक करावे. नंतर एक मेसेज दिसेल. तुम्हाला UAN क्रमांक मिळाला आहे की नाही, हे त्याद्वारे सांगितले जाईल. जर तुम्हाला UAN क्रमांक मिळाला आहे, तर यासंदर्भात तुम्ही आपल्या कंपनीकडून सविस्तर माहिती घेऊ शकतात.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या स्टेप्स, असा अॅक्टिवेट होईल तुमचा UAN नंबर...