आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIC कडून शिका गुंतवणूक करणे, असा मिळवा दुप्पट-तिप्पट रिटर्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एलआयसीकडून खुप काही शिकण्यासारखे आहे. यात गुंतवणूक दुप्पट आणि तिप्पट करणे शक्य आहे. तुम्ही अगदी बरोबर वाचले आहे. एलआयसीने वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करुन दुप्पट आणि तिप्पट रिटर्न मिळवून दिला आहे. अनेक वर्षांपासून ही संस्था अशी करत आली आहे. प्रदीर्घ कालावधीपासून गुंतवणुकीसंदर्भात केलेल्या अभ्यासाचा हा फायदा असल्याचे सांगितले जाते.

 

चालू आर्थिक वर्षांच्या सुरवातीच्या ६ महिन्यातच एलआयसीने स्टॉक मार्केटमधून १३,५०० कोटी रुपयांची नफा कमवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २४ टक्क्यांनी रिटर्नमध्ये वाढ करुन दाखवली आहे.

 

एलआयसीकडून शिकू शकता स्टॉक मार्केटमधून फायदा उचलणे
फायनान्शिअल अॅडव्हायजर फर्म बीपीएन फिनकॅपचे डायरेक्टर ए. के. निगम यांनी सांगितले, की एलआयसीला तुम्ही मेन्टॉर समजू शकता. तिच्या वर्क कल्चरमधून जास्तीत जास्त रिटर्न मिळवायचे कसे हे शिकता येऊ शकते. एलआयसी स्टॉकची निवड अगदी योग्य करते. योग्य वेळी त्याची गुंतवणूक करते. तसेच जास्तीत जास्त फायदा उचलण्यासाठी स्टॉक कधी विकायचे हेही अगदी योग्य प्रकारे निश्चित करते.

 

निगम यांनी सांगितले, की गेल्या अनेक वर्षांपासून एलआयसीने हे वर्क कल्चर संस्थेत रुजविले आहे. याचा अर्थ असा आहे, की स्टॉक मार्गेटमध्ये गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या ओळखणे आणि त्याचा फायदा उचलणे आपल्या हुशारीवर अवलंबून आहे.

 

पुढील स्लाईडवर वाचा, कुठे मिळाले दुप्पट-तिप्पट रिटर्न... कसे...

बातम्या आणखी आहेत...