आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RBIच्या नव्या गव्हर्नरनी पदभार स्वीकारला, स्वस्ताईला ऊर्जितावस्थेचे आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- डॉ.ऊर्जित पटेल यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) २४ वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला. आता त्यांच्यासमोर त्यांचे बहुचर्चित पूर्वाधिकारी रघुराम राजन यांनी घालून दिलेला वारसा कायम राखणे, त्यांची काही अर्धवट राहिलेली कामे पूर्णत्वास नेणे आणि आर्थिक वृद्धी दर प्रभावित करता महागाईवर अंकुश ठेवणे आदी महत्त्वाची आणि कठीण आव्हाने आहेत.

डॉ. पटेल यांनी सप्टेंबर २०१६ रोजी आपला पदभार स्वीकारल्याचे आरबीआयने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. डॉ. पटेल जानेवारी २०१३ पासून डेप्युटी गव्हर्नर होते.
^ डॉ.पटेलांना चलननीती समितीसोबत काम करण्याची सवय घालून घ्यावी लागेल आणि महागाई नियंत्रणाचे लक्ष्य गाठण्याच्या पद्धती शोधाव्या लागतील. अन्नधान्याच्या महागाईवर नियंत्रणाचे आव्हान आहेच. -राजीव कुमार, ज्येष्ठ फेलो.
बातम्या आणखी आहेत...