आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्ल्याची १६२० कोटींची मालमत्ता जप्त, आतापर्यंत ९९६० रुपयांच्या मालमत्तेवर आणली टाच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) फरार घोषित केलेल्या विजय मल्ल्याचे १,६२० कोटी रुपये आणि इतर संपत्ती जप्त केली आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचे कामकाज पाहणाऱ्या विशेष न्यायालयाने यासंबंधीची परवानगी दिली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले, मल्ल्याच्या नावावरील गोठवलेले व गहाण ठेवलेले शेअर्स जप्त करण्यासंदर्भात गुरुवारी देण्यात आले होते.

न्यायमूर्ती पी. आर. भावके यांनी मल्ल्याला फरार घोषित करून त्याने याचिकेत नमूद केलेल्या मालमत्ता जप्त करण्यास सांगितले होते. अधिकाऱ्यांच्या मते, शेअर्ससह मल्ल्याच्या एकूण संपत्तीचे मूल्य १,७०० कोटी रुपयांपर्यंत जाते. सक्त वसुली संचालनालयाने यापूर्वी दोनदा मालमत्ता जप्त केली आहे. आतापर्यंत ९,९६० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, मल्ल्यावर एसबीआयसह १७ बँकांचे ९,४३२ कोटींची थकबाकी आहे. त्याने किंगफिशर एअरलाइन्ससाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. परंतु ही कंपनी २०१२ मध्ये बंद झाली.
बातम्या आणखी आहेत...