गेल्या आठवड्यात (बुधवार ते मंगळवार) देशातील शेअर बाजारात सलग घसरण झाली. जागतिक संकेतांव्यतिरिक्त आर्थिक आणि वित्तीय स्थितीच्या बाबत सकारात्मक बातमी न आल्यामुळेही ही घसरण झाली आहे. त्याच बरोबर विक्रीचा माराही याला कारणीभूत ठरला. या दरम्यान राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी ७,३३६.४० अंकांच्या नीचांकी पातळीवर गेला, जे गेल्या कॉलममध्ये सांगितल्या गेलेल्या ७३५७ अंकांच्या मजबूत आधाराच्या खूपच जवळ आहे.
याव्यतिरिक्त सोमवारी वित्तीय तुटीची आकडेवारी जाहीर झाली असून या आकडेवारीने निराशा वाढवण्याचे काम केले आहे. या डिसेंबरमध्ये निर्यातीत सलग १३ व्या महिन्यात घसरण झाल्यामुळेच वित्तीय तूट वाढली आहे. वास्तविक मंगळवारी बाजारात काही प्रमाणात रिकव्हरी दिसून आली आहे. यामध्ये बँक आणि निर्देशांकाशी जोडल्या गेलेल्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या घसरणीनंतर खालच्या पातळीवर झालेल्या खरेदीचे मुख्य योगदान होते. चीनची अर्थव्यवस्था २०१५ च्या चौथ्या तिमाहीमध्ये सात वर्षांत सर्वात कमी गतीने वाढली आहे. या बातमीच्या आधारावर तेथील बाजारात अफवा पसरली की, चीन सरकारच्या वतीने आर्थिक गती मिळण्यासाठी प्रोत्साहन पॅकेज देणार आहे. या दरम्यान तेलासह इतर कमोडिटीच्या किमतीत घसरण कायम राहिली. थोड्याशा वाढीनंतर कच्च्या तेलाच्या किमती ३० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आल्या आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजाराच्या धारणेवर परिणाम झाला आहे. इराणचे तेलही अजून बाजारात येणार आहे. त्यानंतर बाजारातील कच्च्या तेलाचा पुरवठा कमीत कमी पाच लाख बॅरल प्रति दिवसाने वाढेल. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती आणखी घसरण्याची शक्यता आहे.
जागतिक पातळीवर एकही चांगली बातमी आलेली नाही. अमेरिकेत मोठ्या सुट्यांनंतर मंगळवारी पुन्हा कामकाज सुरू होणार आहे. तसेच शुक्रवारी २.४ टक्क्यांच्या घसरणीनंतर वायदा सौद्यातील धारणा मजबुतीकडे संकेत करत आहे. अमेरिकेतील नुकतीच जाहीर झालेली आकडेवारीदेखील उत्साहजनक राहिली. डिसेंबर महिन्यात किरकोळ विक्रीमध्ये अनपेक्षित घसरण दिसून आली, तर औद्योगिक उत्पादनदेखील घटले. यामुळे चौथ्या तिमाहीबाबत अर्थव्यवस्थेच्या िवकासातील शक्यतेच्या आकडेवारीवर परिणाम झाला. एकूणच देशातील शेअर बाजारात मंदी कायम राहण्याची शक्यता आहे. जोपर्यंत निफ्टी महत्त्वाच्या रेझिस्टन्सच्या पुढे जात नाही, तोपर्यंत बेंचमार्क सूचकांकातील वाढ जास्त काळासाठी दिसण्याची शक्यता नाही. तांत्रिकदृष्ट्या, निफ्टीला पहिला रेझिस्टन्स ७४६२ अंकांच्या जवळपास मिळेल, जो सध्याच्या बंदच्या खूपच जवळ आहे. जर ही पातळी पार झाली तर तेजी टिकण्याची शक्यता आहे. यामुळे निफ्टी ७५९१ अंकांपर्यंत पोहोचू शकतो. ही निफ्टीसाठी दुसरी आणि सर्वात महत्त्वपूर्ण रेझिस्टन्स पातळी असेल. हे निफ्टीला पुढे जाण्यापासून मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात. सामान्य स्थितीत सध्या तरी निफ्टी या पातळीच्या वर जाण्याची शक्यता नाही. जोपर्यंत चीनमधून प्रोत्साहन पॅकेजसारखे संकेत येत नाहीत, तोपर्यंत निफ्टीला या पातळीच्या जवळपास रेझिस्टन्सचा सामना करावा लागणार आहे. जर निफ्टी याच्या पुढे गेला तर त्याला पुढचा रेझिस्टन्स ७६६९ अंकांच्या जवळपास मिळेल.
घसरणीचा विचार केल्यास निफ्टीला पहिला आधार ७३७७ अंकांच्या जवळपास मिळेल. हा एक मध्यम आधार असेल. यानंतर पुढचा ७१९७ अंकांच्या जवळपास मिळेल. सध्या तरी निफ्टीसाठी हा एक मजबूत आधार असेल. शेअरमध्ये या आठवड्यात टीसीएस आणि एचडीएफसी बँक चांगल्या स्थितीत दिसत आहेत. टीसीएस कंपनीचा सध्याचा बंद भाव २,२७९.३० रुपये आहे. हा २,३१२ रुपयांपर्यंत वाढ मिळवू शकतो. घसरणीत त्याला २,२४२ रुपयांच्या जवळ स्टॉप लॉस लावावा. एचडीएफसी बँकेचा सध्याचा बंद भाव १,०३५.८० रुपये आहे. हा १,०५२ रुपयांपर्यंत वाढू शकतो. घसरणीत याला १,०१६ रुपयांवर स्टॉप लॉस लावावा.
लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत.
vipul.verma@dbcorp.in