आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारात "बाउन्स बॅक' दिसण्याचे संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात शेअर बाजारात बेंचमार्क इंडेक्स आणि शेअरच्या किमतीमध्ये अपेक्षेप्रमाणे दरदिवशी पडझड पाहायला मिळाली. नवीन ट्रिगर नसल्याने विदेशी निधी आणि व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात समभाग विकले, तर विक्रीचा दबाव पतधाेरणातील निराशेमुळे बनला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या संकेतांना गुंतवणूकदारांनी सतर्कता आणि अनिश्चिततेची स्थिती येण्याच्या दृष्टीने घेतले. तसेच रेपो रेटमधील ०.२५ टक्के कपात ही या वर्षातील शेवटची कपात असल्याचे मानण्यात आले. त्याबरोबरच आरबीआय पतधोरणाबाबत सतर्क राहणार असल्याचे मत तयार झाले. याव्यतिरिक्त मान्सून खराब आणि उशिरा येण्याची शक्यता. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या विपरीत परिणामांचीदेखील चिंता वाढली. अशा परिस्थितीत गंुतवणूकदारांनी शेअर खरेदी करताना सावध राहणे पसंत केले. अमेरिकेतील बिगरकृषी नोकरीची आकडेवारी अपेक्षेपेक्षा अधिक चांगली आल्यानेदेखील पडझड वाढली आहे. या आकडेवारीमुळे येणाऱ्या काळात अमेरिकेत व्याजदरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे संकेत गुंतवणूकदारांना मिळाले. एकूणच शेअर बाजारासाठी पूर्ण आठवडा खराब राहिला. प्रत्येक दिवशीच त्यात पडझड पाहायला मिळाली.

भविष्याचा विचार केला तर काही कालावधीसाठी शेअर बाजार कमजोर राहण्याची शक्यता आहे. मात्र, लगेचच निफ्टीला ७९९१ अंकांच्या जवळपास चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे. या पातळीच्या जवळपास चांगली स्थिती पाहायला मिळू शकते. भविष्यातील घडामोडींचा अंदाज घेण्यासाठी या पातळीवर बारीक नजर ठेवावी लागणार आहे. निफ्टीला वरच्या पातळीवर ९०५७ अंकांच्या जवळपास पहिला आधार मिळण्याची शक्यता आहे. हा एक मध्यम, मात्र महत्त्वूपर्ण आधार असेल. जर निफ्टी या पातळीला पार करण्यात यशस्वी झाला तर त्याला दुसरा आधार ८०११ अंकांच्या जवळपास मिळेल. मात्र, हादेखील एक मध्यम आधार असेल. यानंतर निफ्टीला पुढचा आधार ८१९१ अंकांच्या जवळपास मिळेल, जो दिशा ठरवणारा असेल. यामुळेच या पातळीवर बारीक नजर ठेवावी लागेल. जर निफ्टीने ही पातळीदेखील ओलांडली तर शेअर बाजारात चांगली वाढ दिसून येईल. निफ्टी ८३७२ पर्यंत वाढू शकतो. याला मजबूत स्थिती म्हणता येईल.

निफ्टीला खालच्या पातळीवर पहिला आधार ७९९१ अंकांच्या जवळपास मिळेल, हा महत्त्वपूर्ण आधार असेल. मात्र, जर ही पातळी ओलांडली तर ते बाजार कमजोर होत असल्याचे संकेत असेल. अशा स्थितीत बाजारात चढ-उतार पाहायला मिळतील. इथे निफ्टी ७९९१ च्या खालच्या पातळीवर बंद होतो का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे आहे.
जर निफ्टी ही पातळी तोडून ७९६१ अंकांच्या वर बंद झाल्यास हे बाजारासाठी चांगले संकेत असतील. मात्र, जर निफ्टी याच्याही खालच्या पातळीवर बंद झाला तर ते बाजारासाठी आणखी पडझडीचे संकेत असतील. अशा स्थितीत त्याला पुढील आधार ७७२३ अंकांच्या
जवळपास मिळेल.

शेअरमध्ये या आठवड्यात बँक आॅफ इंडिया आणि रिलायन्स पाॅवर लिमिटेड चार्टवर चांगलच्या स्थितीत दिसून येत आहे. एसबीआयचा सध्याचा बंद भाव २५७.६० रुपये
आहे. याचे पुढील लक्ष्य हे २६४ रुपये आणि कमीत कमी २५० रुपये आहे. रिलायन्स पॉवरचा सध्याचा बंद भाव ४५.२० रुपये आहे. याचे पुढील लक्ष्य ४७ रुपये आणि कमीत कमी ४३ रुपये आहे.

लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत. vipul.verma@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...