आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता कंपन्यांच्या तिमाही आकडेवारीवर बाजाराचे लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
. यामुळे भारतासह जगभरातील अनेक मोठ्या शेअर बाजारांतील प्रमुख निर्देशांक सोमवारी मोठ्या घसरणीसह बंद झाले. नव्या वर्षाची सुरुवात होताना ही ऐतिहासिकदृष्ट्या खराब सुरुवात होती. म्हणजेच, हेंगसेंग इंडेक्स २.७ टक्के घसरला आणि ही बाब गेल्या ३० वर्षांनंतरची सर्वात खराब सुरुवात आहे. १९८७ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर युरोपीय निर्देशांकातदेखील ही सर्वात खराब सुरुवात राहिली. जर्मनीचे डॅक्स ४.३ टक्क्यांची पडले. १९८८ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर येथील ही सर्वात खराब सुरुवात आहे.

अमेरिकेत एस अँड पी ५०० मध्ये १.५ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. २००१ नंतर व्यवसायाच्या दृष्टीने ही दिवसाची सर्वात खराब सुरुवात आहे. त्या वेळी वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा निर्देशांक २.८ टक्क्यांनी घसरला होता. याचप्रमाणे, नॅसडॅक निर्देशांकात २.१ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. २००१ नंतर हा सर्वात खराब दिवस होता. तर दुसरीकडे, डो जोन्स निर्देशांक १.६ टक्क्यांनी घसरला. ही २००८ नंतरची सर्वात खराब कामगिरी राहिली. नवीन वर्षाची सुरुवातच अशी झाल्यामुळे चीनमधील बाजारातील धोका अद्याप संपला नसल्याची चेतावणी जगभरातील देशांना मिळाली आहे. अशा स्थितीत येणाऱ्या काळात अाणखी घसरण दिसण्याची शक्यता आहे.

देशातील परिस्थिती पाहता नव्या वर्षाची सुरुवातदेखील चांगली नव्हती. डिसेंबर महिन्यात उत्पादन पीएमआयची आकडेवारी दोन वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहाेचली आहे. या आकडेवारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेविषयीची िचंता वाढली असून यामुळे देशातील अर्थव्यवस्थेतही सर्वकाही ठीक सुरू नसल्याचे पक्के संकेत दिले आहेत. आता बाजाराला कंपन्यांची तिसऱ्या तिमाही आकडेवारीची उत्सुकतापूर्वक प्रतीक्षा आहे. तिमाही आकडेवारी लवकरच जाहीर होण्यास सुरुवात हाेईल. अर्थव्यवस्थेतील विकास मोजण्यासाठी बाजार या आकडेवारीकडे पाहील. अमेरिकेतील अ-कृषी आकडेवारीदेखील शुक्रवारी जाहीर होणार आहे. तसेच येणाऱ्या काळात तेथील कंपन्यांची आकडेवारीदेखील जाहीर होण्यास सुरुवात हाेईल. यावर बाजाराचे बारीक लक्ष असणार आहे. वास्तविक देशातील कंपन्यांची तिमाही आकडेवारी खूप जास्त येण्याची अपेक्षा नसली तरी ही आकडेवारी नकारात्मक आल्यास धारणेवर त्याचा परिणाम होईल.

एकूणच या आठवड्यात शेअर बाजारात घसरणीच्या शक्यतेमुळे नीचांकी पातळीवरील शक्यता तपासल्या जातील, ज्यामुळे यानंतर काही अस्थायी रिकव्हरी दिसण्याची शक्यता आहे. तांत्रिकदृष्ट्या विचार केल्यास, शेअर बाजारातील निर्देशांक सध्या खराब दिसत आहे. मात्र, घसरणीची सुरुवात होण्याआधी खालच्या पातळीवर खेरेदी दिसून येऊ शकते. घसरणीचा विचार केल्यास िनफ्टीला पुढचा प्रमुख आधार ७७३३ अंकांच्या जवळपास मिळेल. हा एक चागला आधार असेल. जर िनफ्टी या पातळीच्या खाली येऊन बंद झाला तर याला बाजारात आणखी घसरणीचे संकेत मानावे लागेल. निफ्टीला पुढचा आधार ७७०४ अंकांच्या जवळपास मिळेल. मात्र, हा मध्यम आधार असेल. चांगल्या व्हॉल्यूमसह विक्रीचा मारा झाला तर तो टिकण्याची शक्यता कमी आहे. निफ्टी या पातळीच्या खाली येऊन बंद झाल्यास धारणेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत निफ्टीला पुढचा आधार ७६६१ अंकांच्या जवळपास मिळेल. वाढीचा विचार केल्यास निफ्टीला पहिला रेझिस्टन्स ७८१० अंकांच्या जवळपास मिळेल. हा एक मध्यम मात्र महत्त्वपूर्ण रेझिस्टन्स असेल. जर निफ्टी या पातळीच्या वर गेला तर त्याला पुढचा रेझिस्टन्स ७८९१ अंकांच्या जवळपास मिळेल. निफ्टीसाठी हा एक महत्त्वाचा रेझिस्टन्स असेल. शेअरमध्ये या आठवड्यात आयसीआयसीआय बँक आणि रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन चांगल्या स्थितीत दिसतील. आयसीआयसीआय बँकेचा सध्याचा बंद भाव २५६.७० रुपये आहे. तो २६२ रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता असून त्याला २५१ रुपयांवर स्टॉप लॉस आहे. आरईसीचा सध्याचा बंद भाव २२७.९० रुपये आहे. हा २३३ रुपयांपर्यंत वाढू शकतो. घसरणीत त्याला २२३ रुपयांवर स्टॉप लॉस आहे.
(लेखक तांत्रिक विश्लेषक moneyvistas.com चे सीईओ आहेत.)
(vipul.verma@dbcorp.in)
बातम्या आणखी आहेत...