आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • You Can Get Your Passport In Just 7 Days By These Ways

घरबसल्या मिळवा PASSPORT,पोलिस व्हेरिफिकेशनही होईल ऑनलाइनच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या नव्या धोरणांतर्गत आता पासपोर्ट बनवणे किंवा नूतनीकरणासाठी पोलिस पडताळणी (व्हेरिफिकेशन) ऑनलाइनच होईल. यामुळे तुमचा पासपोर्ट 20 दिवसांऐवजी आठवड्याच्या आत तयार होईल.

गृहखात्याच्या अधिकाऱ्यांनुसार, यंदा नोव्हेंबरपासून हे धोरण येऊ शकते. यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना आधार, मतदान ओळखपत्र आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रारचे (एनपीआर) डाटाबेसचा अॅक्सेस दिले जाईल. डाटाबेसची माहिती गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क यंत्रणेच्या (सीसीटीएनएस) माध्यमातून उपलब्ध होईल.

घरबसल्या एका आठवड्यात मिळवा PASSPORT
पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करणार्‍यांसाठी खूशखबर आहे. आता एका आठवड्याच्या आत अर्जदाराला त्याचा पासपोर्ट मिळणार आहे. विशेष म्हणजे यासाठी डॉक्युमेंट्ससाठी (दस्ताऐवज) देखील धावपळ करण्याची आवश्यकता नाही. अर्जदाराला आपले डॉक्युमेंट्स ऑनलाइन सबमिट करावे लागतील. तसेच आयडी प्रूफ आणि अॅड्रेस प्रूफसाठी आधारकार्ड आवश्यक आहे.
अर्ज केल्यानंतर पुढील तीन दिवसांत अपॉईन्टमेंट मिळेल. पूर्ण प्रक्रियेला साधारण सात दिवस लागतात. यापूर्वी ही प्रक्रिया खूप वेळखाऊ होती. कागदपत्रांची जुळवाजुळव करताना अर्जदाराला मोठी कसरत करावी लागत होती.

आधारकार्ड आवश्यक...
पासपोर्टसाठी केंद्र सरकारने आधारकार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे ज्या अर्जदाराकडे आधारकार्ड नसेल तर पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार नाही. त्यामुळे पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करताना आधी आधारकार्ड बनवून घ्यावे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा Video आणि जाणून घ्या, पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या सोप्या STEPS......