Home | Business | Share Market | 193 crores for employees to get snaps sold

स्नॅपडील विकली गेली तर तिच्या कर्मचाऱ्यांना मिळतील 193 कोटी

वृत्तसंस्था | Update - May 15, 2017, 07:17 AM IST

एखादी कंपनी विकली गेली तर कर्मचाऱ्यांचे नुकसान होते, पण स्नॅपडील या ई-काॅमर्स कंपनीबाबत तसे घडणार नाही. कारण या कर्मचाऱ्यांना तब्बल १९३ कोटींची ऑफर मिळू शकते. स्नॅपडीलमध्ये सध्या दीड ते दोन हजार लोक काम करतात. म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यास सरासरी ९.६५ लाख ते १२.८६ लाख रुपये मिळू शकतात.

  • 193 crores for employees to get snaps sold
    नवी दिल्ली - एखादी कंपनी विकली गेली तर कर्मचाऱ्यांचे नुकसान होते, पण स्नॅपडील या ई-काॅमर्स कंपनीबाबत तसे घडणार नाही. कारण या कर्मचाऱ्यांना तब्बल १९३ कोटींची ऑफर मिळू शकते. स्नॅपडीलमध्ये सध्या दीड ते दोन हजार लोक काम करतात. म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यास सरासरी ९.६५ लाख ते १२.८६ लाख रुपये मिळू शकतात.

    स्नॅपडील ही देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असून फ्लिपकार्टकडून ही कंपनी विकत घेण्याचा प्रस्ताव आहे. देशातील ई-कॉमर्स क्षेत्रात हे सर्वात मोठे अधिग्रहण असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नॅपडीलचे संस्थापक कुणाल बहल आणि राेहित बन्सल यांनी बोर्डास सांगितले : कंपनी विक्रीतून जितके पैसे मिळतील त्यातील अर्धा हिस्सा कर्मचाऱ्यांना दिला जाईल. संस्थापकांना ६ कोटी डॉलर्स इतकी रक्कम मिळणार आहे. त्यापैकी ३ कोटी डॉलर्स म्हणजे १९३ कोटी रुपये होतात. सूत्रांनी सांगितले, गेल्या वर्षी जे सीनियर एक्झिक्युटिव्ह कंपनी सोडून गेले त्यांनाही याचा फायदा मिळू शकतो. कंपनीचे मूल्याकंन घटल्याने वरिष्ठ कर्मचाऱ्यांना दिलेल्या ई-सोपची किंमत घटली आहे. नुकतेच अनेक एक्झिक्युटिव्हज स्नॅपडील सोडून गेले आहेत. कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात १५ टक्क्यांनी वाढ केली आहे, तरीही लोकांना भवितव्याची चिंता वाटते आहे.
    संस्थापक आणि दोन छोट्या कंपन्यांची तयारी : जपानच्या सॉफ्टबँकेची स्नॅपडीलमध्ये सर्वाधिक गुंतवणूक आहे. स्नॅपडीलमध्ये गुंतवणूक केल्यानंतर २०१६-१७ मध्ये ६५०० कोटी रुपयाचा तोटा झाला आहे. त्यांनीच स्नॅपडील विक्रीची प्रक्रिया सुरू केली. आतापर्यंत सॉफ्टबँकेने कुणाल बहल, रोहित बन्सल आणि कालारी कॅपिटल व नेक्सस व्हेंचर पार्टनरला या डिलसाठी तयार केले आहे. दरम्यान, स्नॅपडीलचे मूल्यांकन करण्यात आले असता ते ८५ टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळले.

Trending