आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्फोसिसचे शेअर 6% ने घसरले, सुरुवातीच्या व्यवहारांत कंपनीला 15,000 कोटींचे नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शेअर बाजारात सोमवारी घसरण पाहायला मिळाली. आयटी कंपनी इन्फोसिसला त्याचा मोठा फटका बसला. कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 6 टक्के घसरण पाहायला मिळाली होती. सोमवारी सकाळी शेअर बाजाराला सुरुवात होताच, जवळपास 1099 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी 1,171.45 रुपयांवर इन्फोसिसचे शेअर बंद झाले होते. त्याचबरोबर कंपनीच्या मार्केट कॅपमधून 15,000 कोटी कमी झाले. पण नंतर शेअर्सच्या खरेदीला पुन्हा सुरुवात झाली आणि शेअर्सचे भाव 2.5% पर्यंत रिकव्हर झाले. 


6% टक्के घसरणीने सुरुवात 
- इन्फोसिसच्या शेअर्समध्ये बीएसई आणि एनएसई दोन्ही बाजारांत घसरण पाहायला मिळाली. बीएसईमध्ये 1099 रुपयांनी सुरुवात झाली तर एनएसईवर 6% घसरणीसह 1,102 रुपयांवर सुरुवात झाली. तो दिवसभरातील नीचांक होता. 


तिमाही आकडेवारीचा परिणाम 
- इन्फोसिसच्या शेअर्सवर कंपनीच्या तिमाहीतील आकडेवारीचा परिणाम पाहायला मिळत आहे. शुक्रवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने चौथ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली होती. चौथ्या तिमाहीच्या नफ्यात 28% घसरण पाहायला मिळाली होती. कंपनीचा तिमाही नफा 5,129 कोटींनी घटून 3,690 वर आला आहे. पण वार्षिक आकडेवारी पाहता, कंपनीचा नफा, 3,603 कोटींहून 3,690 कोटी झाला आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 1.6% वाढले आहे. कंपनीची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली पण नफ्याचा आकडा आणि 2018-19 आर्थिक वर्षासाठीचे गाइडन्स कमी झाल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. 


युको बैंकेचे शेअरही घसरले 
621 कोटींच्या कर्ज घोटाळ्यामुळे युको बँकेच्या शेअर्समध्ये आज घसरण पाहायला मिळाली. सुरुवात होताच शेअर 18% घसरून 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. निफ्टीमध्ये शुक्रवारी शेअर 22.25 च्या पातळीवर बंद जाला होता. तो 18.25 रुपयांपर्यंत घसरला. 


घसरणीमुळे माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालकावर गुन्हा 
युको बँकेचे शेअर 621 कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळे गडगडले. शनिवारी सीबीआयने या प्रकरणात कंपनीचे माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. 


हे आहेत आरोपी.. 
- अरुण कौल-माजी सीएमडी, युको बँक
- हेमसिंह भडाना-सीएमडी, एरा इंजीनियरिंग इन्फ्रा इंडिया
- पंकज जैन-चार्टर्ड अकाऊंटंट
- वंदना शारदा - चार्टर्ड अकाऊंटंट
- पवन बन्सल- अलटियस फिनसर्व्ह लिमिटेड

 

 

बातम्या आणखी आहेत...