Home | Business | Share Market | Sensex Nifty Scale Fresh Lifetime Highs Ahead Of Rbi Policy Decision

Sensex 37712 च्या विक्रमी पातळीवर, निफ्टी 11391 वर; स्थानिक, विदेशी गुंतवणुकीचा परिणाम

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 01, 2018, 12:32 PM IST

बीएसईमध्ये सर्व सेक्टर इंडेक्समध्ये तेजी नोंदवण्यात आली. ऑइल अँड गॅस, एफएमसीजी, पीएसयू, मेटल आणि बँकिंग शेअर वधारले.

 • Sensex Nifty Scale Fresh Lifetime Highs Ahead Of Rbi Policy Decision

  - सेन्सेक्स मंगळवारी 37,606.58 च्या विक्रमी पातळीवर बंद झाला होता.

  - गेल्या 7 सत्रांमध्ये सेन्सेक्स 1,110.21 अंकांनी वधारला आहे.


  मुंबई - शेयर बाजार गेल्या आठवड्यापासून दररोज नवी उंची गाठत असल्याचे समोर आले आहे. बुधवारी सेन्सेक्स 37,643.87 वर सुरू झाला आणि 37711.87 चा एक नवा विक्रम रचला. निफ्टीही आतापर्यंतच्या सर्वात उच्च स्तरावर 11,390.55 पोहोचला. निफ्टीची सुरुवात 11,359.80 ने झाली.


  बीएसईमध्ये सर्व सेक्टर इंडेक्समध्ये तेजी नोंदवण्यात आली. ऑइल अँड गॅस, एफएमसीजी, पीएसयू, मेटल आणि बँकिंग सेअर सुमारे 1% पर्यंत वधारले. बजाज ऑटो, वेदांता, टीसीएस, भारती एअरटेल, कोटक बँक, इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, आयटीसी, एसबीआई, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये 1.64% पर्यंत तेजी पाहायला मिळाली. पण काही प्रमाणात विक्रीचा मारा झाल्याने सेशनमध्ये घसरण पाहायला मिळाली.


  आरबीआयकडे डोळे
  ब्रोकर्सच्या मते, आरबीआयच्या पतधोरण जाहीर करण्यापूर्वी गुंतवणूकदार विविध अंदाज बांधत आहेत. विदेशी गुंतवणूकदारही खरेदी करत आहेत. त्यामुळे ही तेजी असल्याचीही शक्यता आहे.

Trending