Home | Business | Share Market | Share Market crashed after Budget 2018

9 वर्षांत प्रथमच बजेटच्या दुसऱ्याच दिवशी सेन्सेक्स 840 अंकांनी कोसळला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 03, 2018, 02:51 AM IST

अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी शेअर बाजारात हाहाकार उडाला. सेन्सेक्स ८३९.९१ अंक आणि निफ्टी २५६.३० अंकांनी गडगड

 • Share Market crashed after Budget 2018

  मुंबई- अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी शेअर बाजारात हाहाकार उडाला. सेन्सेक्स ८३९.९१ अंक आणि निफ्टी २५६.३० अंकांनी गडगडले. अर्थसंकल्पाच्या पुढच्या दिवशी बाजाराच्या प्रतिक्रियेच्या हिशेबाने पाहता ९ वर्षांनंतर इतकी मोठी (२.३५%) घसरण आहे. यापूर्वी १५ फेब्रुवारी २००९ ला अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स २.९१% कोसळला होता. तेव्हा प्रणव मुखर्जी यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. दिवसांच्या हिशेबाने ही अडीच वर्षांतील सर्वात मोठी घसरण आहे. २४ ऑगस्ट २०१५ ला सेन्सेक्स तब्बल १,६२५ अंकांनी कोसळला होता. शुक्रवारच्या घसरणीने गंुतवणूकदारांचे भांडवल सुमारे ४.५ लाख कोटी रुपयांनी घटले आहे.

  घसरणीची ४ मोठी कारणे

  - बजेटमध्ये शेअर्समधून होणाऱ्या कमाईवर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स (एलटीसीजी) आकारणी.

  - सरकारी तुटीचे उद्दिष्ट ३.२% वरून वाढवून ३.५% व २०१९ साठी ३% वरून ३.३% करणे.

  - प्राप्तिकर स्लॅबमध्ये कोणताही बदल न केला जाणे. मर्यादा वाढवण्याची सर्वाधिक आशा होती.
  - फिचने सांगितले की, सरकारवरील कर्जाच्या दबावामुळे रेटिंगमधील सुधारणा राेखण्यात आली.

  आशियाई बाजारांत घसरण - शुक्रवारी आशियाई बाजारांत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सिंगापूर, जपान अशा मार्केटमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले.

  वित्तीय तूट - सरकारने 2018 मधील वित्तीय तूट 3.5 टक्के राहण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मार्केट एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की, जर सरकारने वित्तीय तूट 3.2 किंवा त्यापेक्षा कमी ठेवली तर मार्केटसाठी सकारात्मक ठरले असते. पण 3.5 हा आकडा निराशा पसरवणारा आहे.

  पुढील स्‍लाइडवर पाहा, सेन्सेक्स : अडीच वर्षांतील सर्वात मोठी घसरण...

 • Share Market crashed after Budget 2018
 • Share Market crashed after Budget 2018

Trending