आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर मार्केटच्या पडझडीमध्ये सोनं 14 महिन्यांत उच्च पातळीवर, 330 रुपयांनी वाढले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जागतिक बाजारपेठेमधील नकारात्मरक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला. त्यामुळे सोने 330 रुपयांनी वाढून 31,600 रुपये प्रती ग्राम झाले. ही 14 महिन्यातील सर्वात मोठी वाढ आहे. यापुर्वी 9 नोव्हेंबरला सोन्याचे भाव 31,750 रुपये प्रती ग्राम होते. तेव्हा सोन्यामध्ये 900 रुपयांची वाढ झाली होती. सोन्याचे भाव वाढीची कारण लगनसराई मानले जात आहे. 

 

गुंवणूकदारांचे 5 लाख कोटी बुडाले
आज सेन्सेक्स 1274 अंकांनी घसरत 33482.81 वर उघडला. तर निफ्टी 390 अंकांनी घसरून 10,276.30 अंकांवर उघडला. यामुळे गुंवणूकदारांचे काही मिनिटांतच 5 लाख कोटी रुपये बुडाले. इतिहासामध्ये एकाच दिवशी झालेली ही सर्वाधिक पडझड मानली जात आहे. अमेरिकेच्या बाजारांतील घसरणीमुळे आशियाई बाजारात नफेखोरी पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसत आहे.


रुपयाचीही घसरण
आठवड्याचील व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी रुपयाचीही सुरुवात घसरणीने झालेले दिसून आले. डॉलरच्या तुलनेत रुपयाची 29 पैशांनी घसरण होऊन रुपया 64.35 वर उघडला. सोमवारी रुपया काहीही बदल न होता 64.06 वर बंद झाला होता. 


FII ने केली विक्री, DII ची खरेदी 
सोमलाकी फॉरेन इन्स्टीट्युशनल इनव्हेस्टर्स (एफआयआय) ने भारतीय शेयर बाजारात 1263.51 कोटींची शेअर्स विक्री केली. तर डोमेस्टीक इन्स्टीट्युशनल इनव्हेस्टर्सने 1163.64 कोटींची खरेदी केली. 

बातम्या आणखी आहेत...