Home | Business | Share Market | first order just Rs 650, borrowed computer and now has turn over of 20 cr

पहिली ऑर्डर 650 रुपयांची, कॉम्प्युटरही उधारीचे, आता आहे 20 कोटी टर्नओव्हर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 11, 2017, 05:11 PM IST

नवी दिल्ली- मोठे होण्याचे स्वप्न बघतो आणि त्यासाठी मनापासून धडपड करतो त्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही, असे म्हटले जाते

 • first order just Rs 650, borrowed computer and now has turn over of 20 cr

  नवी दिल्ली- मोठे होण्याचे स्वप्न बघतो आणि त्यासाठी मनापासून धडपड करतो त्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही, असे म्हटले जाते. चांगली नोकरी सोडून बिझनेस करणे हा काही सोपा निर्णय नाही. पण जो अशी जोखीम उचलतो त्यावर लक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. कोलकत्यातील पंकज मालू यांची स्टोरी अशीच आहे. सीएची नोकरी सोडून मित्राकडून कॉम्प्युुटर उधार घेऊन त्यांनी बिझनेस सुरु केला. आज केवळ ४ वर्षांत ते करोडपती झाले आहेत.

  पंकज यांनी सांगितले, की मी मिडलक्लास कुटुंबातील आहे. या क्लासमध्ये बिझनेसपेक्षा नोकरीला प्राधान्य दिले जाते. पैशांची कमतरता असल्याने बिझनेस सुरु करणे अवघड असते. पण बिझनेस करणे हे माझे स्वप्न होते. त्यासाठी मी झपाटलेला होतो. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सीएची नोकरी सोडली. क्रिएटिव्ह फिंगर्स नावाच्या कंपनीची सुरवात केली.

  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, पंकज यांनी कसे गाठले यश... असा झाला २० कोटी टर्नओव्हर...

 • first order just Rs 650, borrowed computer and now has turn over of 20 cr

  अभ्यास करताना नोकरी
  कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे एका सीए फर्ममध्ये ट्रेनी म्हणून नोकरी केली. ३०० रुपये स्टायफंड मिळायचा. त्यातून वैयक्तिक खर्च निघायचा. ग्रॅज्युएशन करताना सीएचा कोर्स जॉईन केला. २००२ मध्ये सीएची परिक्षा उत्तीर्ण झाला. २००३ मध्ये प्रायव्हेट फर्ममध्ये सीएची नोकरी केली. तेव्हा मंथली सॅलरी १२,५०० रुपये होती. पण बिझनेस सुरु करण्यासाठी सहा महिन्यात नोकरी सोडली.

   

  सीए फर्म सुरु केली

  २००४ मध्ये सीएची फर्म सुरु केली
  २००४ मध्ये त्यांनी सीएची फर्म सुरु केली. एक वर्ष काम केले. पण या रस्ता स्वप्नाकडे जाणारा नव्हता याची जाणीव झाली. फर्मपासून ते विलग झाले.

   

  आयटीचा जुनून
  मला आयटीची आवड होती. त्यातून ग्राफिक डिझायनिंग फर्म सुरु केले. वडीलांनी सपोर्ट दिला. तेथूनच मी यशाची पहिली पायरी चढलो.

 • first order just Rs 650, borrowed computer and now has turn over of 20 cr

  मित्राकडून कॉम्प्युटर घेतला उधार
  कंपनी सुरु केली तेव्हा खिशात पैसे नव्हते. मित्राकडून कॉम्प्युटर उधार घेतला. २००५ मध्ये नितिन थापा नावाच्या मित्राच्या मदतीच्या बळावर क्रिएटिव्ह फिंगर्स नावाची कंपनी सुरु केली. पण संकटे संपली नव्हती. कंपनीसाठी जागा हवी होती. पुन्हा एक मित्र मदतीला समोर आला. त्याने भाडे न घेता एक खोली दिली.

   

  ६५० रुपयांची पहिली ऑर्डर

  कंपनी सुरु केल्यानंतर पहिल्या आठवड्यात ६५० रुपयांची पहिली ऑर्डर मिळाली. त्यानंतर बिझनेस खऱ्या अर्थाने सुरु झाला. कंपनीचा टर्नओव्हर ४ लाख रुपयांचा झाला. १०० क्लायंट कंपनीशी जुळले.

 • first order just Rs 650, borrowed computer and now has turn over of 20 cr

  आता टर्नओव्हर २० कोटी
  २००९ मध्ये कंपनीचा टर्नओव्हर २.५ कोटी रुपये झाला. फॉरेन क्लायंटची संख्या वाढली. २००९-१० मध्ये मंदीत कंपनीचे नुकसान झाले. पण मी धीर गमावला नाही. २०१२ मध्ये बिझनेस पुन्हा वाढू लागला. २०१४-१५ मध्ये बिझनेसमध्ये २५ टक्के ग्रोथ केली. आता कंपनीचा टर्नओव्हर २० कोटी आहे. ५०० क्लायंट कंपनीशी जुळले आहेत.

Trending