Home | Business | Share Market | PM Modi likely to take these 4 major decisions in 2018

मित्रो, 2018 मध्ये मोदी घेऊ शकतात नोटबंदीसारखे हे 4 निर्णय, असा होईल परिणाम

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 26, 2017, 11:18 AM IST

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेऊन केवळ भारतालाच नव्हे तर जगाला एक मोठा धक्का दिला होता.

 • PM Modi likely to take these 4 major decisions in 2018

  नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेऊन केवळ भारतालाच नव्हे तर जगाला एक मोठा धक्का दिला होता. आता तुमच्याजवळ असलेल्या १००० आणि ५०० च्या नोटा कागदाचे तुकडे असल्याचे मोदी जाहीरपणे म्हणाले होते. त्यानंतर जनतेने बॅंकांकडे त्यांच्याजवळ असलेल्या नोटा जमा केल्या. त्याऐवजी त्यांना नवीन नोटा देण्यात आल्या. काळ्यापैशांवर कारवाई करण्यासाठी हा धाडसी निर्णय घेण्यात आल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. त्यावर विरोधी पक्षांनी कडाडून प्रहार केला होता. अशा सारखेच आणखी ४ निर्णय मोदी या वर्षी घेण्याची शक्यता आहे. ते कोणते हे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय.

  काय होता नोटबंदीचा निर्णय
  मोदी सरकारने १००० आणि ५०० च्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यासाठी कोणताही कालावधी देण्यात आला नव्हता. मोदी यांनी दूरदर्शनवर घोषणा करत या नोटा बंद केल्या होत्या. त्यानंतर लोकांनी या नोटा बॅंकेत जमा केल्या. तेवढी रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली होती. कलांतराने नवीन नोटा चलनात आणण्यात आल्या.

  पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, मोदी २०१८ मध्ये कोणते ४ मोठे निर्णय घेणार आहेत...

 • PM Modi likely to take these 4 major decisions in 2018

  बेनामी प्रॉपर्टी अॅक्ट

  नरेंद्र मोदी यांनी बेनामी प्रॉपर्टी अॅक्टचा आधीही भाषणांमध्ये अनेकदा उल्लेख केला आहे. २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणूका लागतील. त्यामुळे २०१८ मध्ये हा निर्णय येण्याची शक्यता आहे. हा अॅक्ट लागू केल्यावर बेनामी प्रॉपर्टीवर जोरदार कारवाई केली जाईल. अशा प्रॉपर्टी धारकांना जेलचीही हवा खावी लागू शकते.
   

 • PM Modi likely to take these 4 major decisions in 2018

  राजकीय पक्षांना फंडिंग

  राजकीय पक्षांना मोठमोठ्या रकमा फंडिंगच्या स्वरुपात मिळतात. त्याची माहिती गोपनिय ठेवण्याचा त्यांना अधिकार आहे. पण मोदींनी नवा कायदा लागू केला तर त्यांना याची माहिती जनतेला द्यावी लागेल. मोदींनी या कायद्याचा भाषणात अनेकदा उल्लेख केला आहे. त्याची अंमलबजावणी यावर्षी होऊ शकते.

 • PM Modi likely to take these 4 major decisions in 2018

  ऑनलाईन टॅक्स असेसमेंट

  मोदी सरकार टॅक्स असेसमेंटचा व्यवहार ऑनलाईन करणार आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप कमी होईल. ऑनलाईन माध्यमातून काही क्युरी असल्यास सोडविता येतील. त्याचा फायदा जनतेला आणि सरकारला होईल. भ्रष्टाचार कमी होईल.

 • PM Modi likely to take these 4 major decisions in 2018

  स्विस बॅंकांकडून रिअलटाईम डाटा

  स्विस बॅंकांकडून केंद्र सरकारला काळ्यापैशांबाबत रिअलटाईम स्वरुपात डाटा मिळणे सुरु होईल. त्यानंतर अशा प्रकरणांवर कारवाई करणे सोपे जाईल. याबाबत केंद्र सरकार एखादी यंत्रणा स्थापन करु शकते. त्याचा फायदा होईल.

 • PM Modi likely to take these 4 major decisions in 2018

  सरप्राईज डिसिजन

  मोदी हे सरप्राईज डिसिजनसाठी ओळखले जातात. २०१८ मध्ये त्यांच्याकडून एखादा सरप्राईज डिसिजन येऊ शकतो. त्याचा जनतेवर दुरगामी परिणाम होऊ शकतो.

Trending