30 दिवसांत दुप्पट झाले पैसे, Rcom मध्ये अशी आहे पैसे कमवण्याची संधी
मुंबई- अंबानी कुटुंबातील मोठे बंधू मुकेश अंबानी यांनी सर्वसामान्य लोकांना जिओच्या रुपाने ऑनलाईनचे गिफ्ट दिले आहे
-
मुंबई- अंबानी कुटुंबातील मोठे बंधू मुकेश अंबानी यांनी सर्वसामान्य लोकांना जिओच्या रुपाने ऑनलाईनचे गिफ्ट दिले आहे तर दुसरीकडे लहान बंधू अनील अंबानी यांनी केवळ एका महिन्यात अनेकांना कोट्यधीश केले आहे. अनिल अंबानी यांच्या आर कॉमने (Reliance communications) शेअर मार्केटमध्ये मोठी मजल गाठली आहे. रिलायन्स टेलिकम्युनिकेशनने ३० दिवसांपूर्वी पैसे गुंतवणाऱ्यांची रक्कम तब्बल दुप्पट केली आहे.
मार्केटच्या रिपोर्टप्रमाणे २७ नोव्हेंबर २०१७ रोजी आरकॉमच्या एका शेअरची किंमत १३.३५ रुपये होती. २७ डिसेंबर रोजी एका शेअरची किंमत २६.६६ रुपये झाली. ज्यांनी पैसे गुंतविले त्यांना चक्क दुप्पट रिटर्न मिळाले. या पद्धतीने बघितले तर ज्यांनी १ लाख रुपये गुंतविले त्यांना आज २ लाख रुपये मिळाले आहेत. मार्केट एक्सपर्टनी सांगितले आहे, की आजूनही आरकॉममध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे.
पुढील स्लाईडवर बघा, आरकॉमचा ग्रोथ रिपोर्ट... आणखी ग्रोथ होण्याची शक्यता.
-
दोन दिवसांत ५५ टक्के तेजी
कर्जात बुडालेली रिलायन्स कम्युनिकेशन मार्च २०१८ पर्यंत २५ हजार कोटी रुपये कर्ज फिटवून टाकेल. आर-कॉमचे चेअरमन अनिल अंबानी यांनी हे मंगळवारी सांगितले. त्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.
बुधवारी शेयर 24.98 टक्के वाढून 26.66 रुपयांवर गेला.
पुढील स्लाईडवर वाचा, मार्केट एक्सपर्टचा सल्ला....
-
आणखी ग्रोथ होण्याची शक्यता
एसएमसी इनव्हेस्टमेंट अॅण्ड अॅडव्हायजर्स लिमिटेडच्या रिसर्च विभागाचे हेड सचिन सर्वदे यांनी सांगितले, की कर्जात बुडालेल्या आर-कॉमच्या शेअरमध्ये आणखी तेजी दिसण्याची शक्यता आहे. कंपनीने आपले बिझनेस मॉडेल चेंज केले आहे. कंपनीने कर्जाची रक्कम कमी करण्याचा प्लॅन आखला आहे.