Home | Business | Share Market | read net worth property of celebrity couples in India

हे आहेत भारतातील अब्जाधिश कपल्स, एवढी आहे संपत्ती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 29, 2017, 10:27 AM IST

मुंबई- क्रिकेटर विराट कोहली आणि अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा यांनी नुकतेच लग्न केले. त्यांनी इटलीला गुपचुप लग्न करुन दिल्ली आ

 • read net worth property of celebrity couples in India

  मुंबई- क्रिकेटर विराट कोहली आणि अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा यांनी नुकतेच लग्न केले. त्यांनी इटलीला गुपचुप लग्न करुन दिल्ली आणि मुंबईला ग्रॅंड रिसेप्सन ठेवले होते. भारतातील हे फेमस अब्जाधिश कपल ठरले आहे. त्यांच्याकडे अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे. २०१७ मध्ये असेच काही अब्जाधिश कपल चर्चेत आले होते. त्यांची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

  विराट कोहली आणि अनुष्का शर्मा
  विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी ११ डिसेंबर रोजी इटलीच्या टस्कनीमध्ये लग्न केले. पण अजूनही त्यांचे लग्न आणि रिसेप्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. दोघेही मिडल क्लास कुटुंबात असले तरी मेहनतीच्या बळावर दोघे सेलिब्रिटी ठरले आहेत. दोघांचे प्रेमप्रकरण जसे गाजले तसेच लग्नही गाजले आहे. दोघे भारतातील पॉप्युलर कपल ठरले आहेत. दोघांची मिळून नेटवर्थ ६०० कोटींच्या घरात आहे. त्यात विराट मात्र अनुष्कापेक्षा श्रीमंत असल्याचे दिसते.

  नेटवर्थ- ६०० कोटी रुपये

  पुढील स्लाईडवर जाणून घ्या, या अब्जाधिश कपल्सचे किती आहे नेटवर्थ...

 • read net worth property of celebrity couples in India

  मुकेश आणि नीता अंबानी
  देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लग्नाला ३२ वर्षे झाले आहेत. आजही त्यांची ओळख देशातील फेमस आणि पॉवरफुल कपल म्हणून होते. रिलायन्स जिओच्या लॉंचिंगमुळे दोघे यावर्षीही चांगलेच चर्चेत राहिले.

   

  नेटवर्थ – 42 बिलियन डॉलर

 • read net worth property of celebrity couples in India

  नीरजा आणि कुमार मंगलम बिर्ला
  भारतीय व्यापारी जगात नीरजा आणि कुमार मंगलम बिर्ला खुप फेमस कपल आहे. यावर्षी कुमार मंगलम दोन कारणांनी चर्चेत राहिले. त्यांची कंपनी आयडिया आणि व्होडाफोन याच्या मर्जरच्या बातम्या आल्या होत्या. त्यांची मुलगी अनन्या बिर्ला म्युझिक इंडस्ट्रीत आली. नीरजा कुमार मंगलम यांना व्यवसायात मदत करतात. तसेच मुलीला म्युझिक इंडस्ट्रीतही मदत करतात.

   

  नेटवर्थ - 12.2 बिलियन डॉलर

 • read net worth property of celebrity couples in India

  यास्मिन आणि अजीम प्रेमजी
  देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत अजीम आणि यास्मिन प्रेमजी यांची गणती देशातील पॉवरफुल कपलमध्ये होते. सार्वजनिक कार्य़क्रमांमध्ये दोघांना फार विरळ बघितले जाते. पण लहान मुलांच्या शिक्षणासाठी दोघे प्रयत्नशिल असतात. अजीम यांनी तब्बल २ लाख कोटी रुपये समाजकार्यासाठी दान केले आहेत. यास्मिन गेल्या १२ वर्षांपासून अजीम प्रेमजी फाऊंडेशनच्या डायरेक्टर आहे.

   

  नेटवर्थ - 19 बिलियन डॉलर

Trending