Home | Business | Share Market | Sensex hit record high, Nifty breaches 10600 mark first time

शेअर बाजाराची विक्रमी उसळी : निफ्टी प्रथमच 10600 च्या वर, सेन्सेक्स 34367 वर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 08, 2018, 11:29 AM IST

अमेरिकेच्या बाजारात तेजी आल्याने सोमवारी आशियाई बाजार सर्वकालीन उच्च पातळीपर्यंत पोहोतला.

 • Sensex hit record high, Nifty breaches 10600 mark first time

  नवी दिल्ली - सकारात्मक जागतिक संकेतांमुळे सोमवारी भारतीय शेअर मार्केटची सुरुवात विक्रमी पातळीवर झाली. सुरुवातीच्या तेजीमुळे निफ्टीने प्रथमच 10600 ची पातळी ओलांडली. तर सेन्सेक्सनेही नवीन विक्रम रचला. सेन्सेक्सने 34367.22 ची पातळी गाठली तर निफ्टी 10621.85 पर्यंत पोहोचला. यापूर्वी 5 जानेवारीला सेन्सेक्स 34175 आणि निफ्टी 10.566.10 पॉइंट्सपर्यंत पोहोचला होता.


  शेयर बाजारात का आली तेजी?
  - अमेरिकेच्या बाजारात तेजी आल्याने सोमवारी आशियाई बाजार सर्वकालीन उच्च पातळीपर्यंत पोहोतला. आशियाई बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे बाजाराला सकारात्मक संकेत मिळत आहेत.
  - दुसरीकडे हेवीवेट इन्फोसीस, एचडीएफसी, एसबीआय, ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, मारुती आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समधील तेजीमुळे बाजारात तेजीचे वातावरण आहे. त्याशिवाय मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
  - सेन्सेक्स 62 अंकांनी वाढून 34216 अंकावर सुरू झाला. तर निफ्टी 33 अंकांच्या उसळीसह 10592 अंकावर सुरू झाला.
  - शुक्रवारी सरकारने 2017-18 मध्ये जीडीपीचा अंदाज घटवून 6.5 टक्के असेल असे म्हटले होते. पण बाजारावर त्याचा फारसा परिणाम दिसला नाही.

 • Sensex hit record high, Nifty breaches 10600 mark first time

Trending