Home | Business | Share Market | this businessman lost 1.30 lacks crores in just half an hour

अर्ध्या तासात होत्याचे झाले नव्हते, गमावले 1 लाख 30 हजार कोटी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 29, 2017, 12:24 PM IST

हेजुन यांच्या एका छोट्याशा चुकीने चीनच्या श्रीमंताच्या यादीतूनही त्यांचे नाव मिटले आहे.

 • this businessman lost 1.30 lacks crores in just half an hour

  नवी दिल्ली - काही लाख रुपये जमा करण्यासाठी लोकांचे आयुष्य खर्ची होत असते. मात्र, जगात असेही लोक आहेत ज्यांनी लहानश्या चुकीमुळे काही क्षणांत लाखो-कोटी रुपये बुडवून बसले. त्यापैकी एक म्हणजे चीनचे के ली हेजुन हे आहेत. हेजुन यांच्या एका छोट्याशा चुकीने चीनच्या श्रीमंताच्या यादीतूनही त्यांचे नाव मिटले आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर हाँगकॉंगमध्ये उद्योग करण्यासाठी पुढील 8 वर्षासाठी प्रतिबंध लावण्यात आले.

  पुढील स्लाईडवर वाचा - अर्धा तासात गमावले 1.30 लाख कोटी रुपये

 • this businessman lost 1.30 lacks crores in just half an hour

  अर्धा तासात गमावले 1.30 लाख कोटी रुपये
   
  हेजुन सोलर पावर उपकरण तयार करणाऱ्या हैनर्जी थिन फिल्म पावर ग्रुपचे संस्थापक आहेत. एप्रिल 2015 मध्ये हेजुन च्या कंपनीचे मार्केट कॅप 40 अब्ज डॉलर म्हणजेच 2 लाख 60 हजार कोटी रुपये एवढ होते. मात्र, हाँगकाँगमध्ये मार्केट बंद होण्याच्या अवघ्या 30 मिनीटांपूर्वी शेअरची किंमत निम्मी झाली. त्याबरोबर हेजुन 1 लाख 30 कोटी रुपये गमावून बसले.
   
  पुढे वाचा - हेजुनची कोणती चुकी पडली महागात

 • this businessman lost 1.30 lacks crores in just half an hour

  एक चुकी पडली महाग
   
  शेअर बाजारात कंपनीचे भाव गडगडण्यासाठी हेजुन यांची लहाशनी चुकी महागात पडली. चीनी माध्यमांनी सांगितले की, शेअरहोल्डरच्या बैठकीला अनुपस्थित राहण्यामुळे शेअरचे भाव पडले. त्यांनी सर्वसामान्य बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा त्यांच्या या निर्णयामुळे त्यांना काही क्षणात 1 कोटी 30 लाख रुपयांवर पाणी सोडावे लागले. त्याचबरोबर आता पुढील आठ वर्षे हाँगकाँगमध्ये प्रतिबंधाचीही नामुष्की ओढावली आहे.

Trending