Home | Business | Share Market | MON MARK STMF MRKT ltcg and ddt on mutual funds from april 1 make strategy to save money

1 एप्रिलपासून म्‍युचुअल फंडावर LTCG, डिविडंट टॅक्‍स लागू, पैसे वाचविण्यासाठी बनवा स्‍ट्रैटजी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 17, 2018, 06:50 PM IST

म्‍युचुअल फंडावर लावण्यात आलेला कर 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. या अनुसार म्‍युचुअल फंडाद्वारे मिळणाऱ्या ला

 • MON MARK STMF MRKT ltcg and ddt on mutual funds from april 1 make strategy to save money

  नवी दिल्ली- म्‍युचुअल फंडावर लावण्यात आलेला कर 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. या अनुसार म्‍युचुअल फंडाद्वारे मिळणाऱ्या लाभांशावर 10 टक्के डिविडंट डिस्‍ट्रीब्‍यूशन टॅक्‍स (DDT) आकारण्यात येणार आहे. याशिवाय 10 टक्के लॉग टर्म कॅपिटल गेन टॅक्स (LTCG) लावण्यात आला आहे. हा टॅक्स त्या लोकांना द्यावा लागणार ज्यांना एका वित्तीय वर्षात 1 लाखापेक्षा अधिक कॅपिटल गेन झाला आहे. या कॅपिटल गेनची गणना स्टॉक मार्केट आणि म्युचुअल फंड दोन्हीद्वारे झालेल्या फायद्याला मिळून केली जाणार आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, गुंतवणुकीच्या रणनितीत बदलाव केल्यास कराच्या बोजापासून तुमचा काही प्रमाणात बचाव होऊ शकतो.

  आतापर्यंत गुंतवणूक केलेले काय करु शकतात?
  च्‍वॉइस ब्रोकिंगचे अध्यक्ष अजय केजरीवाल यांच्या मतानुसार म्युचुअल फंडात कुणी पहिल्यापासून गुंतवणूक केली असल्यास त्याने आपल्या पोर्टफोलियोवर नजर टाकावी. जर तुमचा म्युचुअल फंड डिव्हिडंट ऑप्शनमध्ये असल्यास त्याला ग्रोथमध्ये बदलल्यास फायदा होऊ शकतो. कारण म्युचुअल फंड कंपन्या आता लाभांश देताना 10 टक्के कर कापतील. तुम्ही इन्कम टॅक्स भरत असला किंवा भरत नसला तरी तुमचा टॅक्स कापला जाणार आहे. तुम्ही ग्रोथ ऑप्शनमध्ये असा फंड बदलल्यास तुम्हाला करापासून काहीसा दिलासा मिळू शकतो.

  तुम्ही ऑप्शन बदलून ग्रोथचा विकल्प स्वीकारल्यास तुमच्यावर केवळ लाँग टर्म कॅपिटल टॅक्सचीच जबाबदारी असेल. अशा वेळी दरवर्षी आपल्या म्युचुअल फंडाचा काही भाग विकून तुम्ही यापासून बचाव करु शकता.

  काय आहे लाँग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन
  लाँग टर्म कॅपिटल गेन त्याला म्हणतात ज्यात इक्विटी म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास एक वर्षानंतर फायदा होतो. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन त्याला म्हणतात ज्यात शेअर बाजार आणि इक्विटी म्‍युचुअल फंडात गुंतवणूकीनंतर एक वर्षाच्या आत फायदा होतो. अर्थसंकल्पातील प्रस्ताव लागू झाल्यानंतर 2018-19 मध्ये लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 10 टक्क्यांनी द्यावा लागेल तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स 15 टक्के दराने द्यावा लागेल.

  अॅडजस्ट होऊ शकतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स
  जर कोणत्या गुंतवणूकदाराला शॉर्ट टर्म कॅपिटल गेनअंतर्गत गुंतवणुकीवर तोटा झाला असेल आणि दुसऱ्या गुंतवणुकीवर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्सनुसार फायदा झाला तर तो अॅडजस्ट करता येतो. गुंतवणूकदाराने हा तोटा आपल्या रिटर्नमध्ये दाखवल्यास पुढील वर्षांमध्ये या लॉसला अॅडजस्ट करता येते.

  स्टॉक मार्केट आणि म्युचुअल फंडाचा फायदा एकत्र जोडावा लागेल
  शेअरखानचे उपाध्यक्ष मृदुलकुमार वर्मा यांच्या अनुसार लोकांमध्ये भ्रम आहे की, स्टॉक मार्केट आणि म्युचुअल फंडमध्ये लाँग टर्म कॅपिटल गेनचा फायदा वेगवेगळा मिळेल. पण हे सत्य नाही. स्टॉक मार्केट आणि म्युचुअल फंड एक वर्षापेक्षा जास्त गुंतवणूकीवर होणारा फायदा एकत्र जोडला जाईल. त्यानंतरच टॅक्सची गणना केली जाईल.

  पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 • MON MARK STMF MRKT ltcg and ddt on mutual funds from april 1 make strategy to save money
  गुंतवणूकीची रणनिती बदलल्यास फायदा होऊ शकतो.

Trending