Home | Business | Share Market | MON MARK STMF MRKT this scheme of sbi returns up to 36 percent in 1 year you can take the advantage

SBI ने दिला MF च्या या योजनेद्वारे वर्षभरात 36 टक्के रिटर्न, तुम्हीही घ्या फायदा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 16, 2018, 07:08 PM IST

SBI म्‍युचुअल फंडाच्या स्मॉल कॅप आणि मिड कॅप स्कीमने मागील एका वर्षभरात 36 टक्क्याहून अधिक रिटर्न दिला आहे. तर गत तीन वर

 • MON MARK STMF MRKT this scheme of sbi returns up to 36 percent in 1 year you can take the advantage
  असा उचला एसबीआयच्या या योजनेचा फायदा.

  नवी दिल्ली- SBI म्‍युचुअल फंडाच्या स्मॉल कॅप आणि मिड कॅप स्कीमने मागील एका वर्षभरात 36 टक्क्याहून अधिक रिटर्न दिला आहे. तर गत तीन वर्षात या योजनेने 26 टक्के CAGR (सरासरी दरवर्षी 26 टक्के रिटर्न) दिला आहे. एसबीआयची सहयोगी कंपनी एसबीआय म्‍युचुअल फंड अॅसेट अंडर मॅनेजमेंट (AMU) मध्ये देशातील टॉप 5 कंपन्या सामील आहेत. त्यांना हे स्थान मार्च 2018 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात मिळाले आहे. या फंड हाऊस जवळ इक्विटी आणि डेटच्या अनेक पध्दतीच्या योजना आहेत. जेथे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. 8 एप्रिल 2018 रोजी फंडाच्या ग्रोथ ऑप्शनची नेट अॅसेट वॅल्यू (NAV) 57.753 रुपये होती. ही योजना स्मॉल आणि मध्यम कॅटेगिरीत रिटर्न देण्यात टॉपवर आहे.

  SBI MF च्या स्मॉल कॅप आणि मिड कॅप स्कीमचा रिटर्न
  SBI MF च्या स्मॉल कॅप आणि मिड कॅप स्कीमचा रिटर्न गतवर्षी एका वर्षात 36.7 होता. तर गत 3 वर्षात रिटर्न 26.5 टक्के CAGR होता.

  स्‍कीम

  1 वर्षातील परतावा

  3 वर्षातील CAGR परतावा

  एसबीआय स्‍माॅल अॅन्ड मिडकॅप फंड -Direct (G)

  36.7 टक्के

  26.5 टक्के

  एसबीआय स्‍माॅल अॅन्ड मिडकॅप फंड (G)

  35.3 टक्के

  25.0 टक्के

  नोट: डाटा 6 एप्रिल 2018 चा आहे. CAGR रिटर्नचा अर्थ आहे. कंपाउडिंग अॅन्युअल ग्रोथ रेट. डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूकदार थेट कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन गुंतवणूक करु शकतात. अन्य पध्दतींना रेग्युलर प्लॅन म्हणतात.

  कधी सुरु झाली होती स्कीम
  ही योजना 25 ऑगस्ट 2009 मध्ये सुरु झाली होती. हा एक ओपन एन्डेड प्लॅन आहे. त्यात तुम्ही कधीही गुंतवणूक करु शकता. त्यातून तुम्ही कधीही बाहेर पडू शकता. या दोन्ही प्लॅनमध्ये मिळून कंपनीची अॅसेट अंडर मॅनेजमेंट (AMU) 31 मार्च 2018 रोजी 900 कोटी रुपये होती. या योजनेतील एकत्रित पैशांच्या 97 टक्के गुंतवणूक ही इक्विटीमध्ये आहे. या फंडाचे मॅनेजर आर. श्रीनिवासन हे आहेत. ते आणखी काही यशस्वी स्कीम मॅनेज करत आहेत.

  कमीत कमी गुंतवणूकीची रक्कम आणि एक्झिट लोड
  या फंडात तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर कमीत कमी 5 हजार रुपये गुंतवणूक करावी लागेल. पण जर तुम्ही सिपच्या माध्यमातून दरमहा गुंतवणूक करणार असाल तर कमीत कमी 500 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. कंपनी एन्ट्री लोड घेत नाही. तुम्ही एक वर्षानंतर रक्कम काढणार असाल तर तुम्हाला कोणताही एक्झिट लोड काढावा लागणार नाही.

  किती पध्दतीचे विकल्प
  सगळ्या म्युचुअल फंडाप्रमाणे यातही दोन प्रकारचे पर्याय आहेत. एक आहे ग्रोथ, यात गुंतवणूकीप्रमाणे पैसा वाढत जातो. गुंतवणूकदार त्यांच्या गरजेप्रमाणे पैसे काढू शकतात. दुसरी पध्दत लाभांशाची आहे. यानुसार तुम्हाला वेळोवेळी लाभांश देण्यात येतो. हा लाभांश थेट तुमच्या खात्यात जमा होतो. तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणेही पैसे काढू शकता. दोन्ही पध्दतीत योजनेत रक्कम शिल्लक असल्यास स्कीम चालू राहील. या स्कीममध्ये तुमचा पैसा तुमची इच्छा असेल तोपर्यंत राहतो. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही सगळा पैसा काढून स्कीममधून बाहेर पडू शकता.

  टॉप 3 गुंतवणूक
  या फंडाचे पैसे अनेक शेअरमध्ये गुंतवण्यात आले आहेत. त्यातील टॉप 3 गुंतवणूक वेस्टलाईफ, किर्लोस्कर इंडस्ट्रीज आणि एलटी फुड्स आहेत. कंपनीने वेस्टलाईफमध्ये 55.76 ची गुंतवणूक करण्यात आली आहे. याशिवाय किर्लोस्कर इंडस्ट्रीजमध्ये 42.61 कोटी आणि एलटी फूड्समध्ये 41.12 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.

  गुंतवणूकीचे टॉप 3 सेक्टर
  या फंडाची जास्त गुंतवणूक ही महत्वपूर्ण सेक्टरमध्ये आहे. सगळ्यात जास्त गुंतवणूक अभियांत्रिकी क्षेत्रात 21.55 टक्के आहे. त्यानंतर फंडाने बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. या क्षेत्रात फंडाची गुंतवणूक 11.41 टक्के आहे. तिसऱ्या क्रमांकावर मॅन्यूफेक्चरिंग सेक्टर आहे. या क्षेत्रात फंडाची 8.26 टक्के गुंतवणूक आहे.

  एक्सपटर्सचा सल्ला
  अर्थतज्ज्ञांच्या मते हा फंड सातत्याने चांगला परतावा देत आहे. जर यात कोणी दीर्घकालीन फायद्याचा विचार करुन गुंतवणूक केली तर त्याला चांगला फायदा मिळू शकतो.

  पुढे वाचा: यात गुंतवणूक करण्याची पध्दत...

 • MON MARK STMF MRKT this scheme of sbi returns up to 36 percent in 1 year you can take the advantage
  जितक्या दीर्घ काळासाठी गुंतवणूक कराल तितका चांगला परतावा तुम्हाला मिळेल.

Trending