आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ 17 दिवसात 1 लाखाचे झाले 3 लाख रुपये, सरकारही झाले हैराण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एक लाखाची गुंतवणूक अवघ्या 17 दिवसात 3 लाख झाली असे कुणी तुम्हाला सांगितले तर कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही पण असे झाले आहे. तुम्ही जर 9 एप्रिल रोजी एक लाख रुपये गुंतवले असतील तर ते 17 दिवसात म्हणजे 26 एप्रिल रोजी 3 लाखापेक्षा अधिक झाले असेल. इतक्या जास्त परताव्याने मार्केट रेग्युलेटरही हैराण झाले आहेत. 

 


17 दिवसात 1 लाखाचे झाले 3 लाख रुपये
येथे आम्ही चर्चा करत आहोत जेनिथ एक्सपोर्ट्सच्या स्टॉकची. या स्टॉकची किंमत 9 एप्रिल रोजी केवळ 39 रुपये होती. त्यानंतर त्यात इतकी तेजी आली की 17 दिवसानंतर 26 एप्रिल रोजी हा स्टॉक जवळपास 5 पटीने वाढून 126 वर पोहचला. या स्टॉकने मागील 17 दिवसात 223 टक्के रिटर्न दिला आहे. याचा अर्थ असा आहे की स्टॉकवर जर तुम्ही 39 च्या भावावर 1 लाख रुपये लावले असते तर ते वाढून 3.23 लाख रुपये झाले असते.

 

 

मार्केट रेग्युलेटरही झाले आश्चर्यचकित

स्टॉकमध्ये इतकी जास्त तेजी आल्याने मार्केट रेग्युलेटर सेबी सुध्दा आश्चर्यचकित झाले आहे. सेबीने जेनिथ एक्सपोर्ट्स याबाबत नोटीस पाठवून विचारणा केली. त्यावर कंपनीने उत्तर दिले की, अशी कोणतीच घटना किंवा माहिती नाही जी कंपनीच्या ऑपरेशन अथवा परफॉर्मसबाबत असेल. अशी कोणतीही संवेदनशील माहिती नाही ज्याबाबत खुलासा करण्याची गरज आहे.

 

 

पुढे वाचा: कंपनी काय करते...
 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...