आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानी यांच्याबरोबरच्या नात्याच्या चर्चेने पिरामलचा शेअर वधारला, 800 Cr ने वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्यासोबत नातेसंबंधांमुळे अजय पिरामल यांना कोट्यावधीचा फायदा झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी यांचा विवाह पिरामल समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्यासोबत होणार आहे. या वृत्तानंतर सोमवारी पिरामल एंटरप्रायझेसच्या शेअरचा भाव वधारला. काही वेळातच पिरामलचे मार्केट कॅप 800 कोटी रुपयांनी वाढले.

 

 

भारतातील 22 व्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती
फोर्ब्सच्या माहितीनुसार, अजय पिरामल यांची संपत्ती 490 कोटीची म्हणजेच 33 हजार कोटीहून जास्तीची आहे. ते भारतातील 22 व्या क्रमांकाचे तर जगातील 404 व्या क्रमांकाचे श्रीमंत आहेत. पिरामल एंटरप्रायझेसचा व्याप हा 30 देशातील 100 हून अधिक शहरांमध्ये पसरलेला आहे. अजय पिरामल यांची पत्नी स्वाती कंपनीच्या उपाध्यक्षा आहेत. तर त्यांची मुलगी नंदिनी आणि मुलगा आनंद संचालक मंडळावर आहेत. 

 

 

33 हजार कोटीची संपत्ती
फोर्ब्सच्या यादीनुसार पिरामल एंटरप्रायझेसचे मालक अजय पिरामल यांची संपत्ती 33 हजार कोटी रुपये (490 कोटी डॉलर) एवढी आहे. या समुहाचे अध्यक्ष अजय पिरामल हे 62 वर्षांचे आहेत. ते फार्मा, हेल्थ केअर आणि आर्थिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात 1977 मध्ये टेक्सटाईल्सच्या फॅमिली बिझनेसपासून केली. परंतू नंतर त्यांनी फार्मा आणि अन्य क्षेत्रात व्यवसाय सुरु केला. त्यांनी 2010 मध्ये त्यांचा फार्मूलेशनचा उद्योग एबोट लॅबला 3.8 अब्ज डॉलरला विकला.

 

 

पुढे वाढा : परिमलमध्ये कोणाची किती हिस्सेदारी

बातम्या आणखी आहेत...