Home | Business | Share Market | baba ramdev ready buy a big company of India

मोदींच्या निकटवर्तीयांशी बाबा रामदेव यांचा सामना, लावली अब्जावधी रुपयांची बोली

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 09, 2018, 12:15 AM IST

बाबा रामदेव यांची ओळख आता एक लढवय्ये व्यक्ती अशी होऊ लागली आहे. त्यांनी एचयूएल, कोलगेट, डाबर, आईटीसी या कंपन

 • baba ramdev ready buy a big company of India

  नवी दिल्ली- बाबा रामदेव यांची ओळख आता एक लढवय्ये व्यक्ती अशी होऊ लागली आहे. त्यांनी एचयूएल, कोलगेट, डाबर, आईटीसी या कंपन्यांना चांगलीच टक्कर दिली आहे. आता त्यांनी आता एका अशा व्यक्तीला आव्हान दिले आहे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जातात. हे आहेत 55000 कोटी रुपयांच्या नेटवर्थचे मालक असणारे गौतम अदाणी. बाबा रामदेव यांची कंपनी पंतजली आयुर्वेदने एका अशा कंपनीसाठी बोली लावली आहे जी खरेदी करण्यासाठी अदाणी यांची कंपनी अदाणी विल्मर देखील उत्सुक आहे.


  भारतातील 10 व्या क्रमांकाचे श्रीमंत अदानी
  फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, अदानी यांचे 55000 कोटी रुपयांचे (82 अब्ज डॉलर) नेटवर्थ होते. ते भारतातील दहाव्या क्रमांकाचे श्रीमंत आहेत. अदाणी समुह वीज, पोर्ट, इन्फ्रा आणि इडिबल ऑईल सेक्टरमध्ये अॅक्टिव्ह आहे. अदाणी विल्मर ही त्यांची इडिबल ऑईलशी निगडित कंपनी आहे. फॉर्च्यून देशातील सगळ्या जास्त विकले जाणारे तेल आहे. त्याची स्थापना 2000 मध्ये करण्यात आली. या ब्रॅन्डच्या माध्यमातून कंपनी राईस ब्रॅन, मस्टर्ड ऑईल, सनफ्लॉवर ऑईल, ग्राउंडनट ऑईलची विक्री करते.

  या ब्रॅन्डसाठी अदानी-रामदेव यांच्यात स्पर्धा
  अदाणी विल्मरने दिवाळखोरीत मार्गावर असणाऱ्या रुचि सोया या कंपनीला खरेदी करण्यासाठी बोली लावली होती. त्यावेळी अचानक पंतजली आयुर्वेद स्पर्धेत आली. या माध्यमातून पंतजली खाद्यतेल क्षेत्रात उतरण्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. पंतजली या क्षेत्रात आल्यास अदानी यांचे नुकसान होणार आहे.

  पुढे वाचा: पतंजलीने लावली 4 हजार कोटींची बोली

 • baba ramdev ready buy a big company of India

  पतंजलीने लावली 4 हजार कोटींची बोली


  पंतजलीने रुची सोया खरेदी करण्यासाठी 4 हजार कोटींची बोली लावली आहे. ही बोली सर्वाधिक असून पतंजली आयुर्वेदचे इडिबल ऑईल रिफायनिंग आणि पॅकेजिंगसाठी रुची सोयासोबत टाय-अप आहे. रुची सोयावर जवळपास 12 हजार कोटीचे कर्ज आहे. कंपनीकडे अनेक उत्पादन केंद्रे आणि महाकोष, सनरिच, रुची स्टार आणि रुची गोल्ड हे लीडिंग ब्रॅन्ड आहेत.
   

  पुढे वाचा: सगळ्यात मोठी सोयाबिन ऑईल कंपनी बनायचे आहे पतंजलीला

 • baba ramdev ready buy a big company of India

  सगळ्यात मोठी सोयाबिन ऑईल कंपनी बनायचे आहे पतंजलीला


  पतंजलीच्या प्रवक्त्याने म्हटले होती की. त्यांना सोयाबिन ऑईलमध्ये सगळ्यात मोठी कंपनी बनायचे आहे. आम्हाला या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदा करुन द्यायचा आहे. 

   

  गोदरेज, इमामीही स्पर्धेत
  गोदरेज अॅग्रोवेट आणि इमामी अॅग्रोवेटही या स्पर्धेत आहेत. त्यांनी याच्या व्हॅल्यूबाबत माहिती दिलेली नाही. 

Trending