Home | Business | Share Market | bank of India offers home loans at cheaper rates to customers with good credit score

बॅंक ऑफ इंडियाने आणली सगळ्यात स्वस्त होम लोन योजना

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 08, 2018, 01:13 PM IST

बॅंक ऑफ इंडियाने (BOI) 30 लाख रुपये आणि त्याहून जास्तीचे गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी सगळ्यात स्वस्त कर्ज योजना आणल

 • bank of India offers home loans at cheaper rates to customers with good credit score

  नवी दिल्ली- बॅंक ऑफ इंडियाने (BOI) 30 लाख रुपये आणि त्याहून जास्तीचे गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी सगळ्यात स्वस्त कर्ज योजना आणली आहे. बॅंकेने ठरवले आहे की, ज्यांचा सिबिल स्कोर 760 हून अधिक असेल त्यांना मार्जिकल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटच्या (MCLR) बरोबरीने व्याज द्यावे लागेल. कोणतीही बॅंक MCLR हून कमी व्याज दरावर कर्ज देऊ शकत नाही.

  कमी सिबिल स्कोर असणाऱ्यांना द्यावे लागेल जास्त व्याज
  बँकेने म्हटले आहे की, ज्यांचा सिबिल स्कोर 759 किंवा त्याहून कमी असेल त्यांना 30 लाख रुपयाहून जास्तीच्या होम लोनसाठी MCLR शिवाय 0.10 बेसिस पॉईंट जास्त व्याज द्यावे लागेल. एका बेसिस पॉईंटचा अर्थ होतो एका टक्क्याचा शंभरावा हिस्सा.

  चांगला सिबिल स्कोर असणाऱ्यांना मिळेल फायदा
  बॅंकेने म्हटले आहे की, ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असेल त्यांना 30 लाखाहून अधिकचे होमलोन घेतल्यावर फायदा होईल. सिबिल स्कोअर हा तीन अंकी असतो. यातून समजते की तुमचे क्रेडिट बिहेवियर आणि कर्ज परत करण्याचा इतिहास कसा आहे. 300 ते 900 दरम्यान तो जारी करण्यात येतो. तुमचा सिबिल स्कोअर जितका जास्त तितका चांगला मानला जातो.

  चांगला सिबिल स्कोर असणाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी मिळतो फायदा
  - तुमचा सिबिल स्कोर जितका जास्त तितका जास्त बॅंक आणि अन्य ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स दिला जातो. बँक अशा व्यक्तीना चांगले कर्ज घेणारे मानते. अनेक बँक लोन देण्यापूर्वी सिबिल स्कोअर पाहतात. बँक ऑफ इंडियाचे म्हणणे आहे की, जास्त सिबिल स्कोअर असणाऱ्यांना स्वस्त होम लोन देऊन आम्ही लोकांना चांगल्या क्रेडिट हिस्ट्रीसाठी प्रेरित करत आहोत.

  सिबिलने या पावलाचे केले स्वागत
  - सिबिल स्कोअर करणाऱ्या ट्रांसयूनिअन या कंपनीचे म्हणणे आहे की, सिबिल स्कोअरच्या आधारे व्याजात सूट दिल्यामुळे लोकांमध्ये याबाबत जागरुकता वाढेल. याचा फायदा सगळ्यांना मिळेल.

 • bank of India offers home loans at cheaper rates to customers with good credit score

Trending