आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • बॅटरी व्यावसायिकाने एका दिवसात कमावले 23 हजार कोटी, जगातील श्रीमंताना टक्कर Battery Maker Earned Rs 23000 Cr In One Day

Business: बॅटरी व्यावसायिकाने एका दिवसात कमावले 23 हजार कोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एक बॅटरी व्यावसायिक एका दिवसातच अब्जाधीश झाला. 
तुम्हाला हे ऐकायला कदाचित अजब वाटत असेल पण इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी बनविणाऱ्या एका व्यक्तीने एका व्यक्तीने एका दिवसात 23 हजार कोटीहून अधिक रुपये कमावले. तुम्ही विचार करत असाल हे कसे शक्य झाले. ई-व्हीकलची सगळ्यात मोठी चिनी बॅटरी कंपनी कन्टेम्परेरी अम्पेरेक्स टेक्नोलॉजी को. लिमिटेडचा शेअर एक्सचेंजवर लिस्ट झाला. लिस्टिंगनंतर या शेअरमध्ये तेजी आली. त्यामुळे कंपनीच्या संस्थापकाची संपत्ती एका दिवसात 23 हजार कोटी रुपये झाली.

 

 

चीनच्या अब्जाधीशांमध्ये सामिल झाले युकुन
इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी बनविणारी सगळ्यात मोठ्या कंपनीचे संस्थापक जेंग युकुन हे आता अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत. शेअर बाजारात त्यांचा शेअर लिस्ट झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीत  23 हजार कोटी रुपये (340 कोटी डॉलर) एवढी वाढ झाली आहे. कंपनीत जेंग यांची 26 टक्के हिस्सेदारी आहे.

 

 

कंपनीची वॅल्यू 83640 कोटी रुपये
पहिल्या दिवशी कन्टेम्परेरी अम्पेरेक्स टेक्नोलॉजीच्या शेअरमध्ये 44 टक्के तेजी आली. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्स अनुसार, शेअरमधील तेजीमुळे कंपनीचे व्हॅल्यूएशन 83,640 कोटी रुपये (1230 कोटी डॉलर) केली आहे.

 

 

मोठ्या ऑटो कंपन्यांना बॅटरी सप्लाय करते कंपनी
सीएटीएल जगातील मोठ्या ऑटो कंपन्यांना बॅटरी सप्लाय करते. यात निसान मोटार, ह्युंडई मोटार आणि बीएमडब्ल्यू एजीचा समावेश आहे. गतवर्षी कंपनीने जगातील सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक वाहनांना बॅटरी सप्लाय करणाऱ्या पॅनासोनिकला विक्रीबाबत मागे सोडले होते.

 

 

2011 मध्ये सुरू केला होता बॅटरी बिझनेस
50 वर्षीय जेंग यांनी 2011 मध्ये बॅटरी बनविण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यांनी जगभरात सुरु असणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणाचा फायदा घेतला आणि सीएटीएलची स्थापना केली. कंपनी युरोपात आपली फॅक्टरी सुरु करण्याची योजना बनवत आहे. ही फॅक्टरी जर्मनीत स्थापन होऊ शकते. कंपनीचा फोकस जर्मन ऑटो मेकर कंपन्या फॉक्सवेगन, बीएमडब्ल्यू आणि डेलमरवर आहे. 


 

 

बातम्या आणखी आहेत...