आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षात डबल झाला पैसा, या कंपनीने अवलंबला हा हिट फॉर्मूला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जगातील दुसरी मोठी खासगी इक्विटी कंपनी ब्लॅकस्टोनने भारतात गुंतवणूक करुन दोन वर्षात पैसा डबल केला आहे. बाजारात असणारा चढ-उतार पाहिल्यास इतका परतावा आश्चर्यकारण मानण्यात येत आहे. ब्लॅकस्टोनसाठी मात्र ही काय मोठी गोष्ट नाही. कंपनीचा कमाईचा फॉर्मूला भारतात इतका हिट झाला आहे की त्यामुळे मागील 7-8 वर्षात भारतात 30 टक्के रिटर्न मिळेल. त्यांच्यासाठी भारत हा जगातील सर्वाधिक कमाई करुन देणारा देश झाला आहे. 

 

 

दोन वर्षात डबल झाला पैसा
ब्लॅकस्टोन ग्रुपने 1484 कोटी रुपयात भारतातील आयटी कंपनी एमफैसिस मधील 8 टक्के हिस्सा विकला आहे. कंपनीने केवळ दोन वर्षात आपली गुंतवणूक दुप्पट केली आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ब्लॅकस्टोने 926 रुपये प्रति शेअरच्या भावाने एमफैसिसमधील 8 टक्के हिस्सा विकला आहे. एप्रिल 2016 मध्ये त्यांनी 430 रुपये प्रती शेअर आणि पुन्हा 457 रुपये प्रति शेअरच्या किमतीची ओपन ऑफर आणून 60 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. पीई कंपनीने विकलेल्या हिस्सेदारीवर मागील दोन वर्षात डबल परतावा मिळवला आहे. 

 

 

भारतात कमावत आहे 30 टक्के रिटर्न
ब्लॅकस्टोनसाठी भारत सर्वाधिक कमाई करुन देणारा देश आहे. कंपनी आता मोठ्या डीलवर फोकस करत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार पीई कंपनी त्यांनी 2011 नंतर केलेल्या गुंतवणूकीवर 30 टक्क्याहून अधिक परतावा मिळवत आहे. हा परतावा त्यांना जगभरातून मिळणाऱ्या परताव्यात सर्वाधिक आहे. त्यानंतर चीनचा क्रमाक येतो. तेथे त्यांना वार्षिक 25 टक्के परतावा मिळत आहे. 

 

 

पुढे वाचा: काय आहे हिट फॉर्मूला...

बातम्या आणखी आहेत...