आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक निवडणुकीपूर्वी 19 दिवस पेट्रोल दरवाढ नाही, आता 4.5 वाढीची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या १९ दिवस अाधीपर्यंत कंपन्यांनी पेट्राेल-डिझेलचे दर वाढवले नव्हते. मात्र मतदान हाेताच अाता महागाईचा भडका वाढू लागला अाहे. १४ मेपासून चारच दिवसांत दिल्लीत पेट्राेलचे दर प्रतिलिटर ६९ पैशांनी, तर डिझेलचे ८६ पैशांनी वाढले.  गुरुवारी दिल्लीत पेट्राेलचे दर ७५.३२ रुपये, तर डिझेलचे ६६.७० रुपये हाेते. डिझेलचा हा दर सर्वाधिक अाहे, तर पेट्राेलचे दरही सप्टेंबर २०१३ नंतर (७६.०६ रु.) अाता विक्रमी वाढले अाहेत.

 

ब्राेकरेज फर्म काेटक इक्विटीज यांच्या मते, मागील १९ दिवसांत दर न वाढवल्याने कंपन्यांचा नफा घटला अाहे. अाधी कंपन्यांचा ग्राॅस मार्केटिंग मार्जिन २.७० रु प्रतिलिटर हाेता, ताे अाता  ५० ते ७०  पैशांपर्यंत घटला अाहे.  जर तेल कंपन्यांनी निवडणुकीपूर्वी पूर्वीचा नफा कायम ठेवला तर पेट्राेलचे दर ४ ते ४.५५ रुपये व डिझेलचे दर ३.५ ते ४ रुपये आणखी वाढू शकतात.


इराणवर प्रतिबंध व जागतिक पातळीवर मागणी वाढल्याने कच्च्या तेलाचे दर अाणखी वाढू शकतात.  दरम्यान, मध्य प्रदेश छत्तीसगड, राजस्थान व ईशान्येकडील ४ राज्यांत लवकरच विधानसभा निवडणुका हाेणार अाहेत. या प्रचार काळात दर वाढवले जाण्याची शक्यता नाही. मात्र, या निवडणुकीपूर्वीच भारतीय तेल कंपन्या अापला कमी झालेला नफा वाढवून फायदा कमावण्याच्या तयारीत अाहेत. 

 

- 19 दिवस सलग दर वाढवले गेले नाहीत त्यामुळे कंपन्यांना नफा २.७० रुपयांहून ७० पैशांपर्यंत घटला. 

- 04 दिवसांत पेट्राेल ६९ व डिझेल ८६ पैशांनी (प्रतिलिटर) महाग झाले कर्नाटक निवडणुकानंतर. 
- 500 काेटी रुपयांचे नुकसान २४ एप्रिल ते १३ मेदरम्यान कंपन्यांनी भाव न वाढवल्याने.

- 84.14 रुपए प्रति लिटर होता औरंगाबादेत गुरुवारी पेट्रोलचा दर

- 72.10 रुपये प्रति लिटर होता शहरातील डिझेलचा दर

 

अांतरराष्ट्रीय बेंचमार्क रेट ५.६%  पर्यंत वाढला, देशात दर १.३% वाढले  
भारतीय तेल कंपन्या अांतरराष्ट्रीय बेंचमार्कनुसार राेज दर ठरवते. २४ एप्रिलला पेट्राेलचा रेट ७८.८४ डाॅलर प्रतिबॅरल हाेता, ताे अाता ५.६५ % वाढून ८३.३० डाॅलर झाला. डिझेलचा दर ८४.६८ डाॅलरहून ८८.९३ डाॅलर झाला. 

बातम्या आणखी आहेत...