Home | Business | Share Market | follow these 8 money mantra if want to earn from market

मार्केटमधून कमाईचे हे आहेत 8 मंत्र, कमी गुंतवणूकीतच कमवाल लाखो

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 30, 2018, 10:31 AM IST

तुम्हाला चांगला पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला मोठी रक्कम गुंतवावी लागेल हा केवळ एक गैरसमज आहे. तुम्ही कमी गु

 • follow these 8 money mantra if want to earn from market

  नवी दिल्ली- तुम्हाला चांगला पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला मोठी रक्कम गुंतवावी लागेल हा केवळ एक गैरसमज आहे. तुम्ही कमी गुंतवणूक करुनही चांगला पैसा कमावू शकता. पण तुम्हाला बाजाराचे काही मुलभूत नियम लक्षात घ्यावे लागतील. हे ते नियम आहेत जे अनेक मोठे गुंतवणूकदार शेअर बाजारात अवलंबतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही नियम सांगणार आहोत.

  मोठे गुंतवणूकदारही अवलंबतात हे नियम
  आम्ही तुम्हाला असे 8 मंत्र सांगत आहोत जे वॉरेन बफे, राजेश झुनझुनवाला आणि आर.के. दमानी यांनी अवलंबले आहेत. या सगळ्यांची गुंतवणूक आज कित्येक पटीने वाढली आहे. राजेश झुनझुनवाला आणि आर. के. दमानी हे भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. तर वॉरेन बफे हे तर जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात.

  पहिला मंत्र: वाट पाहत बसू नका
  - वॉरेन बफे यांच्या मतानूसार मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही वेळ ही योग्य वेळ असते. तुम्ही मार्केटमध्ये योग्य वेळ येण्याची वाट पाहत बसू नका. तुम्ही कोणत्याही कंपनीचा स्टॉक योग्य किंमतीत मिळत असेल तर गुंतवणूक करा. भले त्यावेळी बाजारात दबाव असेल.
  - अनेक गुंतवणूकदार हे योग्य वेळेची वाट बसतात आणि गुंतवणूकच करत नाहीत. वेळ निघून गेल्यावर ते उच्च किंमतीला शेअर खरेदी करतात आणि नंतर त्यांना नुकसान सहन करावे लागते.

  पुढे वाचा: दुसरा आणि तिसरा महत्वाचा मंत्र...

 • follow these 8 money mantra if want to earn from market

  दूसरा मंत्र: दूसऱ्यांना पाहून पैसा लावू नका...
  - केवळ दुसरे पैसे गुंतवत असल्याने तुम्ही कोणत्याही शेअरमध्ये पैसे गुंतवू नका. कारण त्यामुळे तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. स्टॉक मार्केटचा हाच मंत्र आहे की तुम्ही दुसऱ्याला फॉलो करु नका. 
  - वॉरेन बफे म्हणतात की जेव्हा सगळ्यांना लालच खूणावत असेल तेव्हा तुम्ही सतर्क राहा. तर दुसरे सतर्क असतात तेव्हा तुम्ही कमाईचा विचार करा.

   

   

  तिसरा मंत्र: किंमत नको, मुल्य पाहा
  - शेअर बाजारात पैसा लावताना कधीही असा विचार करु नका की या शेअरची किंमत जास्त आहे म्हणजे हा शेअर चांगला आहे. 50 ते 100 दरम्यान किंमत असणारे शेअरही चांगले असू शकतात. कंपनीचे निकाल चांगले असतील तर बाजारातील चढ-उताराचा प्रभाव त्याच्यावर पडणार नाही.

   

   

  पुढे वाचा: चौथा आणि पाचवा मंत्र...

 • follow these 8 money mantra if want to earn from market

  चौथा मंत्र: डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यांवर ठेवा भरवसा...
  फॉर्च्युन फिस्कलचे डायरेक्टर जगदीश ठक्कर यांचे म्हणणे आहे की, गुंतवणूक करण्यापूर्वा पाहा की कोणत्या कंपन्या नियमित डिव्हिडंड देत आहेत. कोणती कंपनी नियमित लाभांश देत असेल तर याचा अर्थ त्या कंपनीकडे रोख रकमेची कोणतीही कमतरता नाही. अशा कंपन्यासोबत तुमची गुंतवणूक वेगाने वाढू शकते.

   

   

  पाचवा मंत्र: कमी कर्ज असणाऱ्या कंपन्यांची निवड करा
  गुंतवणूक करताना हेही पाहा की कोणत्या कंपनीवर किती कर्ज आहे. कर्ज कमी असणाऱ्या कंपन्यांवरही दबावही कमी असतो. टीसीएस आणि इन्फोसिस सारख्या कंपन्या याचे उदाहरण आहे. 

   

   

  पुढे वाचा: सहावा आणि सातवा मंत्र

 • follow these 8 money mantra if want to earn from market

  सहावा मंत्र: एकाच वेळी सगळी रक्कम लावू नका

   

  - शेअर बाजारात नेहमी चढ-उतार होत असतो. अशात नफा कमवायचा तिसरा नियम आहे की पूर्ण गुंतवणूक कधीही एकाच वेळी करु नका. तुम्हाला एकाच स्टॉकची खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे असलेली रक्कम अनेक हिश्श्यात वेगळी करा आणि हळूहळू त्या स्टॉकची खरेदी करा. जर स्टॉक कोसळत असेल तर ही रक्कम तर तुम्ही कमी रक्कम गुंतवू शकता. पहिल्यांदा रणनिती बनवा आणि मग गुंतवणूक करा.

   

   

  7 वा मंत्र: लक्ष्य साध्य करण्याबाबत व्यावहारिक भूमिका घ्या
  मार्केटमध्ये असेही स्टॉक आहेत ज्यांनी एक वर्षात 100 टक्के परतावा दिला आहे. मजबूत स्टॉक्समध्ये स्थिर वाढ पाहायला मिळते. अशात मार्केटमध्ये सेफ इनवेस्टमेंट अशी ओळख असणार्या स्टॉक्समधून कमी कालावधीत चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता फारच कमी असते. पण दीर्घ कालावधीत हे स्टॉक्स तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतात.

   

   

  पुढे वाचा : आठवा मंत्र

 • follow these 8 money mantra if want to earn from market

  आठवा मंत्र: अफवांकडे लक्ष देऊ नका
  वॉरेन बफे यांच्या म्हणण्यानुसार गुंतवणूक केल्यानंतर सारखी स्टॉकची किंमत पाहणे ही एक चुकीची रणनिती आहे. त्याला काही काळासाठी टाळले पाहिजे. स्टॉक मार्केटमध्ये अफवा खूप वेगाने पसरत असतात. यापासून तुम्ही दूर राहिले पाहिजे. जास्त रिटर्नच्या लालचापासून दूर राहा. तुम्हाला 15 ते 20 टक्के परतावा मिळत असेल तर गुंतवणूक करा. 

Trending