आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याजासोबत मिळतील 30 लाखाच्या फ्लॅटचे पूर्ण पैसे, अशी आहे योजना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 30 लाख रुपयांच्या फ्लॅटसाठी तुम्ही 25 लाखाचे हाउसिंग लोन 25 वर्षाच्या मुदतीसाठी काढल्यास तुम्हाला 60 लाख रुपये चुकवावे लागतील. यातील तुम्ही डाऊनपेमेंट म्हणून दिलेले पाच लाख रुपये जोडल्यास तुम्हाला घर जवळपास 65 लाख रुपयांना पडते. पण तुम्ही कर्ज सुरु झाल्यावर लगेच 3100 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुमचे कर्ज 25 वर्षानंतर पूर्ण होईल आणि तुम्हाला 65 लाख रुपये परत मिळतील.

 

 

असे करा प्लॅनिंग
आर्थिक सल्ला देणारी संस्था बीपीएन फिनकॅपचे संचालक ए. के. निगम यांच्या म्हणण्यानुसार हे एक विशेष प्लॅनिंग आहे. जे गुंतवणूकदारांना घर किंवा फ्लॅट पू्र्ण मोफत देते. त्यांच्या म्हणण्यानुसार तुमच्या कर्जाचा जो हप्ता असेल त्याच्या 15 टक्के पैसा तुम्ही एका चांगल्या म्‍युचुअल फंडात गुंतवा. चांगला म्‍युचुअल फंड तुम्हाला 5 वर्षात 30 टक्के परतावा देतो. पण तुम्हाला जर केवळ 12 ते 13 टक्के परतावा मिळाला तरी तुम्हाला डाउन पेमेंटसह पूर्ण हाउसिंग लोन परत मिळेल. हा फॉर्म्‍यूला तुमचे कितीही रुपयांचे लोन असेल तरी उपयोगी येईल. 

 

  

हे उदाहरण समजून घ्या
समजा तुमचा 30 लाख रुपयांचा फ्लॅट आहे आणि तुम्ही 5 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केले आहे. तुम्ही 25 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. सध्या SBI चा गृहकर्जाचा व्याजदर 8.40 टक्के आहे. या व्याजदरावर 25 वर्षासाठी तु्मच्या 25 लाख रुपयांच्या कर्जासाठी 19962 रुपये एवढा हप्ता पडेल. या हप्त्याच्या पंधरा टक्के रक्कम 3100 रुपये होते. तुम्ही एवढी गुंतवणूक दरवर्षी म्युचुअल फंडात करा. 25 वर्षानंतर तुम्हाला या गुंतवणूकीवर 65 लाख रुपये मिळतील.

 

 

एका नजरेत गुंतवणूकीची योजना
- 30 लाख रुपयांचे घर 
- 5 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट
- 25 लाख रुपयांचे हाउसिंग लोन
- SBI च्या सध्याच्या गृहकर्जाचा व्याजदर 8.40 टक्के
- एका महिन्याचा हप्ता 19962 रुपये
- व्याजासह तुम्हाला द्यावे लागतील 60 लाख रुपये 
- 5 लाख डाउन पेमेंट मिळून तुम्हाला 25 वर्षानंतर द्यावे लागतील 65 लाख रुपये

 

 

असे मिळतील 65 लाख रुपये
- 3100 रुपयांनी सुरु करा म्‍युचुअल फंडात गुंतवणूक
- हाउसिंग लोनसोबत 25 वर्ष ही गुंतवणूक सुरु ठेवा
- या गुंतवणूकीवर 13 टक्के परतावा
- 25 वर्षानंतर तुम्हाला मिळतील 65 लाख रुपये

 

 

पुढे वाचा : टॉप 5 म्‍युचुअल फंड योजना

 

बातम्या आणखी आहेत...