Home | Business | Share Market | gold rises on jewellers buying and global cues

लग्नसराईमुळे मागणी वाढल्याने सोने, चांदीला झळाळी

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 07, 2018, 07:55 PM IST

जागतिक बाजारात तेजी असल्याने आणि स्थानिक बाजारपेठेत मागणी वाढल्याने सोने महागले आहे. दिल्लीत सोन्याच्या भावा

  • gold  rises on jewellers buying and global cues

    नवी दिल्ली- जागतिक बाजारात तेजी असल्याने आणि स्थानिक बाजारपेठेत मागणी वाढल्याने सोने महागले आहे. दिल्लीत सोन्याच्या भावात 100 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या सोन्याचा भाव 32,180 रुपये प्रती दहा ग्रॅम एवढा आहे. औद्योगिक कारणांमुळे चांदीलाही मागणी असल्याने चांदीच्या भावातही वाढ झाली आहे. 100 रुपयांनी वाढ झाल्याने चांदीचा प्रतिकिलो भाव 40,600 रुपयांवर पोहचला आहे.

    हे आहे भाववाढचे कारण
    व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, लग्नसराई असल्याने सोन्याला मागणी वाढली आहे. त्यामुले स्थानिक व्यापारी, रिटेलर्स खरेदी करत आहेत. जागतिक स्तरावर ही वाढ 0.10 टक्के असून सोने 1,316.30 डॉलर प्रति औंस आणि चांदी 0.09 टक्के तेजीसह 16.51 डॉलर प्रति औंसवर आहे.

Trending