Home | Business | Share Market | gold rises rs 150 on jewellers buying

GOLD: मागणी वाढल्याने सोन्याच्या भावात मोठी वाढ, चांदी घसरली

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 13, 2018, 04:38 PM IST

दोन दिवस दर कोसळल्यानंतर आज सोन्याच्या भावात पुन्हा तेजी पाहायला मिळाली. स्थानिक सराफ व्यापाऱ्यांकडून मागणी

  • gold rises rs 150 on jewellers buying

    नवी दिल्ली- दोन दिवस दर कोसळल्यानंतर आज सोन्याच्या भावात पुन्हा तेजी पाहायला मिळाली. स्थानिक सराफ व्यापाऱ्यांकडून मागणी असल्याने बुधवारी सोने 150 रुपयांनी वाढून 31,950 रुपये प्रती दहा ग्रॅमच्या स्तरावर पोहचले. तर चांदीच्या भावात घसरण दिसून आली चांदीचा भाव 10 रुपयांनी घसरुन 41,550 रुपये प्रती किलोग्रॅमच्या स्तरावर पोहचला.

    या कारणांमुळे महागले सोने
    ट्रेडर्सने सांगितले की, बाजारात मागणी वाढल्याने सोन्याचा दर वधारला. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर असल्याने इंपोर्ट महागला, त्यामुळेही सोने वधारले आहे. सिंगापूरमध्ये सोने 1,293.20 डॉलर प्रति औस होता. चांदी 0.21 डॉलर कोसळून 16.80 डॉलर प्रति औस होता.

Trending