Home | Business | Share Market | how this woman earned rs 20 crore by simple idea

कॉलेजमधील मुलीला मिळाली बिझनेस आयडिया, प्रमोशनसाठी केले असे काही

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 15, 2018, 12:06 AM IST

बिझनेसची आयडिया कुठे आणि कधी मिळेल हे कुणालाही सांगता येणार नाही. तुम्हाला सहज फिरतानाही बिझनेसची आयडिया मिळू शकते. आम्ह

 • how this woman earned rs 20 crore by simple idea

  नवी दिल्ली- बिझनेसची आयडिया कुठे आणि कधी मिळेल हे कुणालाही सांगता येणार नाही. तुम्हाला सहज फिरतानाही बिझनेसची आयडिया मिळू शकते. आम्ही तुम्हाला अशाच एका मुलीची माहिती देत आहोत जी पॅरिस फिरण्यास गेली आणि तिला मिळालेल्या बिझनेस आयडियाने करोडपती झाली.

  कशी मिळाली बिझनेसची आयडिया
  2009 मध्ये सॅन डियागो विद्यापीठातून इंग्रजी साहित्यातून पदवी प्राप्त केल्यानंतर जेनेसा लियोनी हिला आयाची नोकरी मिळाली. नोकरी सोबतच लियोनीने लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि अभ्यास सुरु केला. या काळातच लियोनीला पॅरिसला जाण्याची संधी मिळाली आणि जिचे जीवनच बदलले. पॅरिस फिरण्यासाठी गेलेल्या लियोनीला तिथे एक बिझनेस आयडिया मिळाली. पॅरिसमध्ये लियोनीला 1940 मध्ये एक हॅट पसंद आली आणि ती तिने 10 यूरोला खरेदी केली. लियोनीला ही हॅट इतकी आवडली की तिने स्वत: डिझाईन करुन हॅट बनवण्यास सुरुवात केली. तिने काहीच वर्षात 20 कोटी रुपयांचा (30 लाख डॉलर) उद्योग उभा केला.

  पुढे वाचा: कसा सुरु केला व्यवसाय...

 • how this woman earned rs 20 crore by simple idea

  कर्जाशिवाय सुरु केला व्यवसाय
  पॅरिसमध्ये बिझनेस आयडिया सुरु करण्यासाठी लियोनीने आपल्या वडिलांचा सल्ला घेतला. तिच्या वडिलांनी तिला कर्ज न घेण्याचा सल्ला दिला. व्यवसाय करण्यासाठी तिने दोन वर्ष आयाची नोकरी केली. या दरम्यान तिने 10,000 डॉलर (6.70 लाख रुपये) वाचवले. लियोनीला हॅट बनविण्याची आयडिया नव्हती. तिने आयाची नोकरी करत असतानाच हॅट बनविण्याच्या व्यवसायाविषयी संशोधन केले. आपल्या वडिलांच्या सल्ल्याने 2000 डॉलर (1.30 लाख रुपये) गुंतवणूकीतुन हॅट बनविण्याचे काम सुरु केले.

   

  पुढे वाचा: प्रमोशनसाठी केले असे काही...

 • how this woman earned rs 20 crore by simple idea

  प्रमोशनसाठी केले असे काही...
  लियोनीने बिझनेस प्रमोशनसाठी एका नामांकित फॅशन संपादकांना आपली हॅट गिफ्ट केली. तिने क्लिक मीडियाचे संस्थापक आणि फॅशन एडिटर हिलेरी केर यांची भे्ट घेतली आणि त्यांना हॅट दाखवली. केर यांच्याशिवाय लियोनीने आपली हॅट वोग मॅग्झिनच्या कव्हरसाठी गिफ्ट केली. यानंतरच्या दोन आठवड्यातच लियोनीला मोठी ऑर्डर मिळाली. 

   

   

  पुढे वाचा: फोर्ब्स 2015 च्या 30 अंडर 30 च्या लिस्ट मध्ये झळकली लियोनी..

 • how this woman earned rs 20 crore by simple idea

  फोर्ब्स 2015 च्या 30 अंडर 30 च्या लिस्ट मध्ये झळकली लियोनी..
  लियोनीच्या हॅट जगभरातील 450 हून अधिक दुकानांमध्ये मिळते. लिव टेलर, क्रिसी टिगेन, जेसिका अल्बा आणि लूपिटा न्योनगो सारख्या सिलिब्रेटिज त्यांची हॅट वापरतात. 2015 मध्ये फोर्ब्सने आर्ट आणि स्टाईल कॅटिगरीमध्ये लियोनी यांना 30 अंडर 30 लिस्टमध्ये सामील केले.

Trending