Home | Business | Share Market | idea cellular q4 loss widens nearly three fold to rs

Q4 मध्ये आयडियाच्या तोट्यात तिप्पट वाढ, ऑपरेटिंग रेव्हेन्यू 24 टक्क्यांनी घटून 6,137 कोटी रूपये

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 28, 2018, 08:59 PM IST

आर्थिक वर्ष 2018 च्या चौथ्या तिमाहीत आयडिया सेल्यूलरचे नुकसान तिपटीने वाढून 930.6 कोटी रूपयांपर्यंत पोहोचला

 • idea cellular q4 loss widens nearly three fold to rs

  नवी दिल्ली- आर्थिक वर्ष 2018 च्या चौथ्या तिमाहीत आयडिया सेल्यूलरचे नुकसान तिपटीने वाढून 930.6 कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आहे. ऑपरेटिंग रेव्हेन्यू 24 टक्क्यांनी कमी होऊन 6,137 कोटी रूपये इतका झाला आहे.

  आयडिया सेल्यूलरने आर्थिक पडझडीला गळेकापू स्पर्धा आणि कठोर नियमांना जबाबदार धरले आहे. आयडियाला आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 4,139.90 कोटी रूपयांचे मोठे नुकसान झाले. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये कंपनीच्या नुकसानीचा आकडा 404 कोटी रूपयांपर्यंत आला होता.

  पुढे वाचा: जिओला झाला किती फायदा

 • idea cellular q4 loss widens nearly three fold to rs

  जिओला 510 कोटी रूपयांचा फायदा

  याच कालावधीत रिलायन्स जिओने 510 कोटी रूपयांचा फायदा कमावला आहे. सप्टेंबर 2016 मध्ये जिओच्या प्रवेशानंतर दूरसंचार क्षेत्रात प्राइस वॉर भडकले आणि याचा थेट आणि नकारात्मक परिणाम प्रतिस्पर्धी कंपन्यांवर पडत आहे.

Trending