आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर तुमच्याकडे असेल आयडिया तर अंबानी बनवतील बिझनेसमॅन, देतील 3 महिन्यांचे ट्रेनिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलायन्स पैसे देखील लावते. - Divya Marathi
रिलायन्स पैसे देखील लावते.

नवी दिल्ली- जर तुमच्याकडे आयडिया असेल तर मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. यासाठी कंपनीने JioGenNext प्‍लेटफॉर्म विकसित केला आहे. हे स्टार्टअप तुम्हाला Jio इकोसिस्‍टमची मदत उपलब्ध करुन देईल. येथे कंपनीचे एक्सपटर्स तुम्हाला सल्ला व प्रशिक्षण देतील. येथे तुम्ही तुमची बिझनेस आयडिया कधीही देऊ शकता. कंपनी दर तीन महिन्यांनी एक नवा कार्यक्रम सुरू करते. यात नव्या लोकांना सामील करुन घेण्यात येते.

 

 

काय आहे प्रोग्राम
कंपनी JioGenNext नावाने एक इकोसिस्टिम चालवते. येथे नवी आयडिया देणाऱ्यांना तीन महिन्याचे ट्रेनिंग देण्यात येते. येथे बिझनेस आयडिया पाठविल्यानंतर ती एक्सपर्ट्ससमोर ठेवण्यात येते. ही आयडिया पसंत आल्यास तुमची 3 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी निवड करण्यात येते. येथे रिलायन्सचे बिझनेस लीडर ट्रेनिंग देण्याशिवाय तुम्हाला तुमची स्टार्टअप सुरु करुन पुढे नेण्याची पध्दतही सांगतात.

 

 

पैसेही लावू शकते रिलायन्स
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स Jio ट्रेडिशनल वेंचर कॅपिटल फर्म नाही. पण ते अशा कंपनीत गुंतवणूक करु शकतात जे RIL किंवा Jio चे लक्ष्य साध्य करण्यास मदत करु शकतात. तुम्हाला RIL किंवा Jio सोबत काम करण्याची इच्छा असली तरी कंपनी याची कोणतीही गॅरेटी देत नाही. पण ते यावर विचार करु शकतात.

 

 

कशी लोकांना निवडते रिलायन्स
रिलायन्स अशा लोकांची निवड करते ज्यांना त्या कामाची आवड आहे आणि कामाप्रती भरवसा आहे. हे लोक दुसऱ्यांसाठी उदाहरण बनु शकतात. त्यांची दुसऱ्याचे ऐकण्याची तयारी असेल.

 

 

काय मिळते मदत
निवड झालेल्या व्यक्तींची देशातील सगळ्यात चांगल्या स्टार्टअपमधील व्यक्तींशी संपर्क करुन देण्यात येतो. येथे मार्केट टेस्ट, कमर्शियल पार्टनरशीप याबाबींविषयी माहिती देण्यात येते. गुंतवणूकदारांना भेटण्याची संधीही त्यांना देण्यात येते. 

 

 

पुढे वाचा: किती दिवस येथे थांबणे गरजेचे
 

बातम्या आणखी आहेत...