Home | Business | Share Market | know about isha ambanis father in law include in indias top rich list

33 हजार कोटींची अंबानींच्या समधीची संपत्ती, भारतातील टॉप श्रीमंतांमध्ये समावेश

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 07, 2018, 12:34 PM IST

मुकेश अंबानी यांच्या मुलीचा ईशाचे लग्न अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्यासोबत ठरला आहे. फोर्ब्सने 9

 • know about isha ambanis father in law include in indias top rich list
  अजय पिरामल यांच्या मुलासोबत मुकेश अंबानी यांच्या एकलुती एक मुलगी ईशाचे लग्न होणार आहे.

  नवी दिल्ली- मुकेश अंबानी यांच्या मुलीचा ईशाचे लग्न अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्यासोबत ठरला आहे. फोर्ब्सने 9 फेब्रुवारी 2018 रोजी जारी केलेल्या श्रीमंताच्या यादीत अजय पिरामल हे 22 व्या स्थानावर आहेत. आता त्यांची दौलत 4.9 अब्ज डॉलर आहे.

  33 हजार कोटी रुपयांची आहे अजय पिरामल यांची दौलत
  - फोर्ब्सच्या यादीनुसार पिरामल एंटरप्रायझेसचे मालक अजय पिरामल यांची संपत्ती 33 हजार कोटी रुपये (4.9 अब्ज डॉलर) आहे. या समुहाचे अध्यक्ष अजय पिरामल हे 62 वर्षांचे आहेत. ते फार्मा, हेल्थ केअर आणि आर्थिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात 1977 मध्ये टेक्सटाईल्सच्या फॅमिली बिझनेसपासून केली. परंतू नंतर त्यांनी फार्मा आणि अन्य क्षेत्रात व्यवसाय सुरु केला. त्यांनी 2010 मध्ये त्यांचा फार्मूलेशनचा उद्योग एबोट लॅबला 3.8 अब्ज डॉलरला विकला.

  कौन कौन आहे त्यांच्या परिवारात
  अजय पिरामल यांची पत्नी स्वाती या कंपनीच्या उपाध्यक्षा आहेत. तर नंदिनी आणि आनंद कंपनीच्या संचालक मंडळात आहे.

  पुढे वाचा: डिसेंबरमध्ये होणार मुकेश अंबानींच्या मुलीचे लग्न

 • know about isha ambanis father in law include in indias top rich list
  डिसेंबरमध्ये ईशा आणि आनंद पिरामल यांचे लग्न होणार आहे.

  मुलाचे नुकतेच ठरवले होते लग्न

  मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि श्‍लोका मेहता यांचा मार्चमध्ये प्री-एंगेजमेंट समारंभ झाला होता. श्‍लोका या रोजी ब्‍लू डायमंडचे हेड रसेल मेहता आणि मोना मेहता यांची सगळ्यात लहान मुलगी आहे. आकाश आणि श्‍लोका यांचे लग्न डिसेंबरमध्ये होणार आहे. हे दोघे अनेक वर्षापासून मित्र आहेत. दोन्ही कुटूंबाचे अनेक वर्षापासून चांगले संबंध आहेत. 

   

Trending