Home | Business | Share Market | know how this saving account may give up to 3 times return

बचत खात्याची ही योजना आहे लय भारी; बँकेपेक्षा देते तिप्पट परतावा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 24, 2018, 12:54 PM IST

पैशाची गरज तुम्हाला कधीही आणि कुठल्याही वेळी पडू शकते. त्यामुळे कधीही सारा पैसा एकाच योजनेत गुंतवू नका. तुमच

 • know how this saving account may give up to 3 times return

  नवी दिल्ली- पैशाची गरज तुम्हाला कधीही आणि कुठल्याही वेळी पडू शकते. त्यामुळे कधीही सारा पैसा एकाच योजनेत गुंतवू नका. तुमचा काही पैसा तुम्ही निश्चितच बचत खात्यात ठेवला पाहिजे. कारण हा पैसा तुम्ही कधीही काढू शकता. तुम्ही गुंतवणूक करताना एक विचार निश्चितच करत असाल तो म्हणजे तुम्ही केलेल्या गुंतवणूकीवर किती परतावा मिळतो.


  बॅंक असो की पोस्ट ऑफिस येथील बचत खात्यावर तुम्हाला वर्षाला केवळ 4 टक्के परतावा मिळतो. पण एक योजना अशी आहे जिथे तुम्हाला बचत खात्यासारख्या सुविधा मिळतात शिवाय तुम्हाला 9 ते 12 टक्के व्याज मिळते. म्हणजेच बँकेच्या बचत खात्यापेक्षा तिप्पट परतावा मिळतो. या योजनेत तुम्ही पैसे जमा करु शकता किंवा काढू शकता. जाणून घेऊ या योजनेविषयी...

  पुढे वाचा: या योजनेच्या सगळ्या डिटेल्स...

 • know how this saving account may give up to 3 times return

  येथे मिळेल जास्त फायदा
  - आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत बचत खात्यासारखी सुविधा देणाऱ्या लिक्विड फंडाविषयी. हा फंड तुम्हाला बचत खात्यापेक्षा जास्त व्याजदर देतो. मागील एक वर्षात अनेक लिक्विड फंडांनी 9 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. तर काही फंडांनी 12 टक्के परतावा दिला आहे. तो केवळ बचत खात्यापेक्षाच नाही तर एफडीपेक्षाही जास्त आहे.  

   

   

  काय आहे हा फंड
  - लिक्विड फंड हा एका पध्दतीचा म्यूचुअल फंड आहे. हे असे फंड असतात जेथे जोखीमही कमी असते. लिक्विड फंडाचे दुसरे नाव आहे कॅश फंड असेही आहे. जास्त तरलता, कमी जोखीम आणि स्थिर परतावा ही याची वैशिष्टये म्हणावी लागतील. हे फंड गवर्नमेंट सिक्योरिटीज, सर्टिफिकेट ऑफ डिपॉजिट, ट्रेजरी बिल्स, कॉमर्शियल पेपर्स आणि दूसऱ्या डेट इंस्टू्मेंट्समध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे हे सुरक्षित साधन म्हणून ओळखले जाते.

   

   

  पुढे वाचा: काय आहेत लिक्विड फंडाचे लाभ...

 • know how this saving account may give up to 3 times return

  लिक्विड फंडाचे लाभ
  - या फंडाचा कोणताही लॉक-इन पिरियड नसतो. म्हणजेच गुंतवणूक केल्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही पैसे काढू शकता. तुम्ही एका आठवड्यासाठीही गुंतवणूक करु शकता. 
  - या योजनेत तुम्ही पाहिजे तेव्हा अतिरिक्त पैसे जमा करु शकता आणि ते काढू शकता.
  - ही योजना बँकेतील आणि पोस्टातील आरडी सारखी काम करते.
  - लिक्विड फंडात व्याजदरातील चढ-उताराची जोखीम सगळ्यात कमी असते. कारण हे फंड प्राथमिक स्वरुपात अल्पावधीत मॅच्यूर होणाऱ्या फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात.
  - या फंडांमध्ये कोणताही एन्ट्री किंवा एक्झिट लोड नसतो.

   

   

  पुढे वाचा: कसा निवडाल योग्य लिक्विड फंड...

 • know how this saving account may give up to 3 times return

  कसा निवडाल योग्य लिक्विड फंड
  लिक्विड फंडाच्या रिटर्नमध्ये जास्त असमानता नसते. कारण सगळे लिक्विड फंड एकाच पध्दतीच्या सिक्‍युरिटीज गुंतवणूक करतात. लिक्विड फंडात गुंतवणूकीचा निर्णय घेताना हे जरुर पाहा की ज्या लिक्विड फंडात तुम्ही गुंतवणूक करत आहात त्याचा आकार काय आहे. त्याचा कॉर्पस किती आहे. या फंड हाऊसचा इतिहास काय आहे. 

  लिक्विड फंडात अनेक प्लॅन्स
  लिक्विड फंडात अनेक प्लॅन्स आहेत. तुम्ही ग्रोथ, दैनिक डिव्हिडंट प्लॅन, साप्ताहिक डिव्हिडंट प्लॅन आणि मासिक डिव्हिडंट प्लॅनची निवड करु शकता. ग्रोथ प्‍लॅन अंतर्गत कोणत्याही डिव्हिडंटची घोषणा करण्यात येत नाही. फंडात होणारी वाढ ही यूनिट व्हॅल्यूच्या स्वरुपात पाहता येते.

   

   

  पुढे वाचा: कशी कराल गुंतवणूक

 • know how this saving account may give up to 3 times return

  कशी सुरु कराल गुंतवणूक
  - तुम्ही म्यूचुअल फंडात पहिल्यांदा गुंतवणूक करत असाल तर फंड मॅनेजर तुमचे केवायसी तयार करेल. त्यानंतर पहिल्या महिन्याच्या हप्त्यासाठी एक चेक, ईसीएससाठी ऑटो डेबिट फॉर्म आणि एक कॉमन फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर तुमची लिक्विड फंडात एसआयपी सुरु होईल. 

   

Trending