CNG पंप उघडण्याची / CNG पंप उघडण्याची संधी, ही आहे A to Z प्रोसेस

May 20,2018 04:38:00 PM IST

नवी दिल्ली- गेल आणि एचपीसीएलची जॉईंट व्हेचर कंपनी अवंतिक गॅस लिमिटेडने CNG नेटवर्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी महिन्यात सरकारने 100 CNG पंप उघडण्याची घोषणा केली होती. याचाच अर्थ तुम्हाला तुमच्या शहरात किंवा गावात सीएनजी पंप उघडण्याची संधी आहे.

फायद्याची संधी
तुम्हाला तुमच्या शहरात किंवा गावात सीएनजी पंप उघडून चांगला नफा कमावण्याची संधी आहे. देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना सीएनजी पंप उघडण्याची ईच्छा आहे पण प्रोसेस माहिती नसल्याने ते तसे करु शकत नाहीत. आम्ही तुम्हाला सीएनजी पंप उघडण्याची पुर्ण प्रोसेस सांगत आहोत. यातुन तुम्हाला व्यवसासाची आणि लोकसेवेची संधी मिळू शकते.

पुढे वाचा: कोण उघडू शकते CNG पंप

कोण उघडू शकते CNG पंप - CNG पंपाचे मालक होण्यासाठी तुमच्याकडे भारतीय नागरित्व असावे. - तुमचे वय 21 ते 55 वर्ष दरम्यान असावे. - कमीत कमी दहावीपर्यंतचे शिक्षण झालेले असावे. जमीन असावी - CNG पंप उघडण्यासाठी तुमच्याकडे जमीन असणे गरजेचे आहे. जर जमीन तुमच्या स्वत:ची नसेल तर जमीन मालकाकडून NOC घ्या. - तुम्ही तुमच्या कुटूंबातील कोणत्याही सदस्याची जमीन घेऊन CNG पंपासाठी अर्ज करु शकता. यासाठी तुम्हाला NOC आणि affidavit बनवावी लागेल. - भाड्याने घेतलेल्या जमिनीसाठी तुमच्याकडे भाडेकरार असावा. सोबतच Registered sales deed किंवा lease deed असावी. - जमीन हरित पट्टयात नसावी. - शेतजमीन असल्यास तुम्हाला ती अकृषिक करुन घ्यावी लागेल. - तुमच्याकडे जमिनीची सगळी कागदपत्रे आणि नकाशा असावा. कसा कराल अर्ज कंपन्या वर्तमानपत्रात आणि संकेतस्थळावर जाहिरात देतात की त्यांना कुठे CNG पंप उघडायचा आहे. तुमची जमीन त्यांना अपेक्षित असलेल्या ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास असल्यास तुम्ही अर्ज करु शकता. अर्ज करण्यासाठी कंपन्यांच्या संकेतस्थळावरही ऑप्शन असतो. उदाहरणार्थ तुम्ही हरियाणा सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (HCG) च्या संकेतस्थळावर https://www.hcgonline.co.in/our-bussiness/cng/cng-dealership जाऊन संपूर्ण माहिती घेऊ शकता. हिन्दुस्तान पेट्रोलियम लिमिटेड, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडसारख्या कंपन्या वेळोवेळी CNG पंपाच्या डीलरशिपसाठी जाहिरात देत असतात.पुढे काय होईल जर तुम्ही अर्ज केलात तर तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेलसह सगळी महत्वपुर्ण माहिती द्यावी लागेल. याशिवाय तुम्हाला लोकेशनचीही माहिती द्यावी लागेल. लोकेशन सिलेक्टा झाल्यावर कंपनी तुम्हाला स्वत:च संपर्क करते. अनेक स्टेपमधुन गेल्यावर तुम्हाला लायसन मिळते.
X