फॉर्मूला 72 तुम्हाला सांगेल कुठे होईल पैसा डबल, जाणून घ्या त्याविषयी
प्रत्येकाला वाटते की पैसे अशा ठिकाणी गुंतवावेत जेथे ते कमीत कमी कालावधीत दुप्पट होतील. आजच्या काळात यासाठी ब
-
नवी दिल्ली- प्रत्येकाला वाटते की पैसे अशा ठिकाणी गुंतवावेत जेथे ते कमीत कमी कालावधीत दुप्पट होतील. आजच्या काळात यासाठी बॅंक, पोस्ट ऑफिसपासून सरकारी बॉन्ड, म्युचअल फंडसारखे अनेक लोकप्रिय मार्ग आहेत. तुम्ही वेगवेगळ्या स्कीममधून किती रिटर्न मिळेल हे जाणून घेऊ शकता. पण हे जाणणे अवघड आहे की कोणत्या स्कीममधून पैसे वाढून दुप्पट होतील. अनेक लोक पैसे गुंतवतात पण त्यांना नेमके माहिती नसते की पैसे किती दिवसात डबल होतील.
अशात आम्ही तुम्हाला एक खास फॉर्मुला सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही सहज जाणून घेऊ शकता की किती कमी वेळेत पैसे डबल होतील. हा फॉर्मुला रुल ऑफ 72 म्हणून ओळखला जातो. याद्वारे तुम्हाला हे जाणून घेण्यास अवघा दोन मिनिटाचा कालावधी लागेल. त्यामुळे पैसे कुठे गुंतवावेत याचा निर्णय घेणे सोप जाईल.
पुढे वाचा: काय आहे रुल ऑफ 72 चा फॉर्मूला ....
-
या फॉर्मूल्याने घ्या जाणून
- फायनान्सचा खास नियम आहे की, रुल ऑफ 72 हा एक्सपर्ट्स सगळ्यात प्रभावी मार्ग मानतात. ज्याद्वारे हे निश्चित केले जाते की गुंतवणूक किती दिवसात दुप्पट होईल.याद्वारे तुम्हाला हे समजेल की जर तुम्ही बँकेची एखादी स्कीम निवडली तर त्यावर तुम्हाला 8 टक्के व्याज मिळेल.
- रूल 72 अंतर्गत 72 ला 8 ने भागायचे असते.
- 72/8= 9 वर्ष, याचा अर्थ या स्कीम अंतर्गत तुमचे पैसे 9 वर्षात दुप्पट होतील.
- 72 ची निवड अनेक अर्थाने सुविधाजनक आहे. यातुन तुम्हाला लगेच आकलन होऊ शकते की तुमची गुंतवणूक दुप्पट होण्यास किती कालावधी लागेल. यात 6 ते 10 टक्के व्याज दराच्या हिशोबाने कालावधी काढणे सोपे आहे.कोणत्या योजनेत किती दिवसात होतील पैसे दुप्पट
बँक FD
SBI 1 ते 10 वर्षासाठी एफडीवर 6.75 टक्के व्याज देते.
-72/6.75 =10.6 वर्ष
- म्हणजेच नियम 72 नूसार 10.6 वर्षात ही गुंतवणूक दुप्पट होईल.बँक सेव्हिंग स्कीम
अनेक बँका सेव्हिंग अकाऊंटवर 4 टक्के व्याज देतात.
- 72/4=18 वर्ष
- नियम 72 च्या हिशोबाने 18 वर्षात पैसे डबल होतील.पुढे वाचा, पोस्ट ऑफिससहित या स्कीममध्ये किती दिवस लागतील...
-
पोस्ट ऑफिस डिपॉझिट
-रिटर्न: 7.4% दराने वर्षाला
-72/7.9= 9.7 दराने वर्षाला
- नियम 72 नूसार 9.7 वर्षात तुमचा गुंतवणूक दुप्पट होईल.
सरकारी ब्रॉन्ड्स
-रिटर्न: 7.8% दराने वर्षाला
-72/7.8= 9.2 वर्ष
- नियम 72 नूसार 9.2 वर्षात तुमची गुंतवणूक दुप्पट होईल.म्युचुअल फंड
मागील वर्षात अनेक म्युचुअल फंडांनी 8 ते 12% वार्षिक व्याजदराने रिटर्न दिला आहे.
12 टक्के व्याजदराने रिटर्न- 72/12=6 वर्ष
- नियम 72 नूसार 6 वर्षात तुमची गुंतवणूक दुप्पट होईल.