Home | Business | Share Market | LIC policy holders dont do following mistakes, you lose money

एलआयसी होल्डर्स लक्ष द्या, करुन नका या चुका, बसेल आर्थिक फटका

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 14, 2017, 06:00 AM IST

नवी दिल्ली- एलआयसीच्या पॉलिसी होल्डर्सची संख्या मोठी आहे. पॉलिसी होल्डर्सच्या नावावर होणारी फसवणूक रोखण्यासाठी एलआयसीने

 • LIC policy holders dont do following mistakes, you lose money
  नवी दिल्ली- एलआयसीच्या पॉलिसी होल्डर्सची संख्या मोठी आहे. पॉलिसी होल्डर्सच्या नावावर होणारी फसवणूक रोखण्यासाठी एलआयसीने खास अॅडव्हायजरी जारी केली आहे. एलआयसीची कोणती ना कोणती पॉलिसी आहे अशा लोकांसाठी ही अॅडव्हायजरी देण्यात आली आहे. तसेच भविष्यात एलआयसीशी संलग्न होऊ शकतात अशा लोकांसाठीही ही अॅडव्हायजरी काढण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही एलआयसीचे पॉलिसी होल्डर असाल तर या ७ बाबी नेहमीच लक्षात ठेवा.
  १- पॉलिसीचा प्रिमियम भरण्यासाठी देण्यात येणारा चेक केवळ Life Insurance Corporation Of India च्या फेवरमध्ये असावा. दुसऱ्या नावाचे चेक देण्यास सांगितले असेल तर तसे करु नका असे एलआयसीने सांगितले आहे.

  २- पॉलिसीचा वेळोवेळी स्टेट्स चेक करत राहा. यासाठी www.licindia.in ला भेट द्या.
  पुढील स्लाईड्सवर वाचा... एलआयसी होल्डर्सनी काय घ्यावी काळजी...

 • LIC policy holders dont do following mistakes, you lose money
  3- स्वाक्षरी करण्यासापूर्वी कागदपत्रे नीट वाचून घ्या. त्यानंतरच त्यावर सही करा. त्यासाठी वेळ हवी असल्यास तसे एजंटला सांगा. त्यामुळे भविष्यात समस्या उद्भवणार नाहीत.
  ४- पॉलिसीचे ओरिजनल डॉक्युमेंट कुणालाही देऊ नका. तुमच्या अधिकाऱ्यांचे हस्तांतरण करणे शक्य नाही. एलआयसी याची परवानगी देत नाही.
  ५- एखाद्या व्यक्तीचा फोन आला आणि ती एसआय़सी मधून बोलत आहे असे म्हणत असेल तरी तुमची गोपनिय माहिती शेअर करु नका.
 • LIC policy holders dont do following mistakes, you lose money
  ६- एलआयसी बोनस किंवा राहिलेल्या इन्स्टॉलमेंटसाठी कधी फोन करत नाही. अशा स्वरुपाचा फोन आला तर सतर्क व्हा.
  ७- एलआयसीला एनईएफटीच्या माध्यमातून पेमेंट करा. पेमेंट करण्याचे हे सुरक्षित माध्यम आहे. यात फसवणूक होऊ शकत नाही.

Trending