Home | Business | Share Market | Microsoft founder Bill Gates suggests these 5 books to readers

बिल गेट्स म्हणतो- प्रत्येकाने ही 5 पुस्तके वाचायलाच हवीत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 15, 2017, 11:25 AM IST

मुंबई- जगातिल सर्वात श्रीमंत बिझनेसमन आणि मायक्रोसॉफ्ट या आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीचा मालक बिल गेट्स पुस्तकी किडा आहेत.

 • Microsoft founder Bill Gates suggests these 5 books to readers

  मुंबई- जगातिल सर्वात श्रीमंत बिझनेसमन आणि मायक्रोसॉफ्ट या आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीचा मालक बिल गेट्स पुस्तकी किडा आहे. यशात या पुस्तकांचा मोठा वाटा आहे, असे तो सांगतो. वाचण्याची आवड असल्याने वेगवेगळ्या पुस्तकातून त्याने वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या. त्यातील चांगल्या बाबी आयुष्यात आणि कामात रुजविल्या. केवळ बिझनेस रिलेडेट नाही तर वेगवेगळ्या विषयांची पुस्तके तो वाचतो. त्याच्या सोबत असलेल्या लोकांना तो ही पुस्तके वाचण्याचा सल्ला देतो. बिझनेस वेबसाईट इंक डॉट कॉम च्या रिपोर्टनुसार बिल गेट्स कायम या ५ पुस्तकांचा उल्लेख करतो. ही पुस्तके कोणत्याही व्यक्तिला वैचारिक करतात असे तो सांगतो.

  १) सेपियन्स- ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्युमनकाईंड

  लेखक- युवाल नोह हरारी


  बिल गेट्स आणि त्याची पत्नी मेलिंडा यांनी हे पुस्तक वाचले आहे. डिनर घेताना त्यांनी यावर बरीच चर्चा केली आहे. या पुस्तकाच्या लेखकाने खुप आव्हानात्मक काम केले आहे. संपूर्ण मानवी इतिहास केवळ ४०० पानांमध्ये कव्हर केला आहे. मानवी इतिहास आणि त्याच्या भविष्यात रस असलेल्या लोकांनी हे पुस्तक निश्चितच वाचायला हवे.

  जाणून घ्या या पाच पुस्तकांबद्दल...

 • Microsoft founder Bill Gates suggests these 5 books to readers

  २) हाऊ नॉट टू बी रॉंग
  लेखक- जॉर्डन अॅलनबर्ग

   

  मॅथमॅटिशिअन आणि लेखक जॉर्डन अॅलनबर्ग यांनी सांगितले आहे, की गणित किती आवश्यक आहे. गणित आपल्या दैनंदिन आयुष्यात समावले आहे. तरीही त्याची माहिती आपल्याला नसते.

 • Microsoft founder Bill Gates suggests these 5 books to readers

  ३) दी बुली पलपिट- थियोडोर रुजवेल्ट, विलियम्स होवर्ड टेफ्ट अॅण्ड दी गोल्डन एज ऑफ जर्नलिझम
  लेखिका- डोरिस कियर्न्स गुडविन

   

  हे पुस्तक ऑटोबायोग्राफी आहे. ही एक प्रेस हिस्ट्रीही आहे. असे म्हटले जाते, की हे थ्री इन वन पुस्तक आहे. सामाजिक बदल कसा होतो असा प्रश्न यात लेखिकेने विचारला आहे. तोच प्रश्न गेट्स यांनाही पडतो. एखाद्या प्रभावी लिडरने बदल होतो, की याची अनुकूल परिस्थिती तयार होते.

 • Microsoft founder Bill Gates suggests these 5 books to readers

  ४) इरॅडिकेशन- रिडिंद द वर्ल्ड ऑफ डिसिजेस ऑरएव्हर
  लेखिका- नॅन्सी स्टीफन

   

  एखाद्या आजाराचा समुळ नाश करण्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न करु शकता आणि त्यानंतरही कसे तुम्हाला यश मिळत नाही याची ही स्टोरी आहे. काही आजारांपासून मुक्ती मिळविण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात लोक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या संघार्षाच्या इतरांना कसा फायदा होतो हे यात सांगितले आहे.

 • Microsoft founder Bill Gates suggests these 5 books to readers

  ५) दी सिक्स्थ एक्स्टिंक्शन
  लेखिका- एलिझाबेथ कोलबर्ट

   

  यात लेखिकेने सिक्स्थ एक्स्टिंक्शनची तुलना सध्याच्या बदलांशी केली आहे. त्याचे बरेच विश्लेषण केले आहे. सध्या निसर्गातील काही घटक तीव्र गतीने नष्ट होत आहेत. त्यांचीही तुलना यात आहे.

Trending