आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FD हून 4% जास्त व्याज, मर्यादित कालावधीसाठी आहेत या दोन नव्या योजना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दोन कंपन्यांनी FD पेक्षा 4% जास्त व्याजदर देणाऱ्या योजना बाजारात आणल्या आहेत. दिवाण हाऊसिंग फायनान्स अॅण्ड लीजिंग (DHFL) ने 10.10 व्याज देणारी नॉन कन्वर्टिबल डिबेंचर (एनसीडी) घेऊन आली आहे. जर जेएम फाइनेंशियलने 9.75 टक्के व्याज देणारी एनसीडी आणली आहे. या दोन्ही योजनांमध्ये 10 वर्षासाठी गुंतवणूक करता येऊ शकते.

 

 

प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य
या योजनेत प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे ही योजना पर्याप्त निधी उभारणी झाल्यावर बंद करण्यात येणार आहे. या दोन्ही कंपन्यांना डिबेंचर आणण्याची परवानगी रजिस्टर ऑफ कंपनीच्या महाराष्ट्र कार्यालयाकडून देण्यात आली आहे. बॅंकांच्या दीर्घ कालावधीच्या FD वर सध्या 6.25 टक्के व्याजदर मिळत आहे. 

 

 

काय आहे नॉन कन्वर्टिबल डिबेंचर
कंपन्या आपली आर्थिक गरज लक्षात घेऊन डिबेंचर आणतात. ते दोन पध्दतीचे असतात. एक कन्वर्टिबल आणि दुसरे नॉन कन्वर्टिबल डिबेंचर. जिथे कन्वर्टिबल डिबेंचरचा ऑप्शन असतो तेथे तो शेअरमध्ये बदलतो. नॉन कन्वर्टिबलमध्ये असा ऑप्शन नसतो. असे डिबेंचर मुदतपुर्तीनंतर व्याजासोबत गुंतवणूकादारांना पैसे देतात.

 

 

DHFL ने अर्ज करण्याची प्रक्रिया केली सुरू
DHFL चे सिक्युरड रिमिडेबल नॉन कंवर्टेंबल डिबेंचर 22 मे रोजी खुले झाले आहे. यात अनेक पध्दतीच्या गुंतवणूक योजना आहेत. ज्यात 9.10 टक्के व्याज मिळेल. एक टक्के व्याज एकदाच अतिरिक्त लाभाच्या स्वरुपात देण्यात येईल. तुम्ही तीन वर्षासाठी पैसे गुंतवल्यास तुम्हाला 8.90 टक्के व्याज मिळेल. तर 5 ते 7 वर्षासाठी पैसा लावल्यास 9 टक्के व्याज मिळेल. सगळ्यात जास्त व्याज 10 वर्षासाठी पैसे लावल्यास 9.10 टक्के व्याज मिळेल.

 

 

गुंतवणूकदाराची इच्छा असल्यास त्याला दरमहा किंवा वार्षिक व्याजही मिळू शकते. जर या पर्यायांमध्ये पैसे नको असेल तर मॅच्यूरिटीवर एकत्र तो मिळू शकतो. ज्येष्ठ नागरिकांना 0.10 टक्के जास्त व्याज मिळेल.

 

 

कमीतकमी गुंतवणूक आणि रेटिंग
या योजनेत तुम्हाला कमीत कमी दहा हजाराची गुंतवणूक करावी लागते. जास्तीत जास्त गुंतवणूकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. DHFL च्या योजनेस रेटिंग एजन्सी इकराने AAA आणि BWR ने सुध्दा AAA रेटिंग दिली आहे. कंपनीच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार कोणी डिमॅटच्या माध्यमातून या योजनेत पैसा लावला तर त्यावर TDS कापण्यात येत नाही. 22 मे पासून गुंतवणूकीसाठी खुली झालेली ही योजना 4 जूनपर्यंत गुंतवणूकदारांसाठी खूली राहणार आहे. पण ही योजना पर्याप्त निधीची उभारणी झाल्यास कधीही बंद होऊ शकते. कंपनीच्या वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात येईल.

 

 

वेबसाईटवर पूर्ण माहिती
कंपनीची वेबसाईट https://www.dhfl.com/ वर जाऊन या योजनेची माहिती घेऊन तुम्ही गुंतवणूक करु शकता. एजंटच्या माध्यमातूनही तुम्ही गुंतवणूक करु शकता. 

 

 

जेएम फायनेंशियलची योजना होणार 28 मे पासून सुरु 
जेएम फायनेंशियलचे डिबेंचर 28 मे रोजी खुले होणार आहे. यात 20 जून पर्यंत अर्ज करु शकता. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वाच्या आधारे गुंतवणूक स्वीकारली जाणार आहे. कंपनीने अनेक पध्दतीच्या योजना लॉन्च केल्या आहेत. दहा वर्षाच्या गुंतवणूकीवर 9.75 टक्के व्याज देण्यात येणार आहे. गुंतवणूकदार हे व्याज मासिक किंवा वार्षिक स्वरुपातही घेऊ शकतात. ते हे व्याज कालावधी पुर्ण झाल्यावरही घेऊ शकता. जास्तीत जास्त दहा वर्षे आणि कमीत कमी 38 महिन्यांसाठी तुम्ही गुंतवणूक करु शकता.

 

 

कमीतकमी गुंतवणूक आणि रेटिंग
यात तुम्ही कमीत कमी 10 हजार रुपये गुंतवणूक करु शकता. जास्तीत जास्त गुंतवणूकीस कोणतीही मर्यादा नाही. इकराने या योजनेस AA तर IND ने सुध्दा AA  रेटिंग दिले आहे. कंपनीच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास TDS कापण्यात येणार नाही. 28 मे रोजी गुंतवणूकीस खूली झालेली ही योजना  20 जून पर्यंत गुंतवणूकीस खुली राहणार आहे. पण पर्याप्त निधीची उभारणी झाल्यास ही योजना बंद करण्यात येईल. कंपनीच्या वेबसाईटवर याबाबतची माहिती देण्यात येईल.

 

 

कंपनीच्या वेबसाईटवर अधिक माहिती
कंपनीची वेबसाईट https://www.jmfl.com/  वर जाऊन तुम्ही योजनेची माहिती घेऊ शकता. एजंटच्या माध्यमातूनही तुम्ही गुंतवणूक करु शकता.

 

 

पुढे वाचा: गुंतवणूकीशी निगडित धोके

बातम्या आणखी आहेत...