Home | Business | Share Market | petrol and diesel prices touches all time high

डिझेलनंतर पेट्रोलचा दर अाता विक्रमी पातळीवर; एका दिवसात झालेली ही सर्वाधिक वाढ

वृत्तसंस्था | Update - May 21, 2018, 01:16 AM IST

पेट्रोलचे दर रविवारी विक्रमी वाढले. दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर ७६.२४ रुपयांवर पोहोचले. यापूर्वी १४ सप्टेंबर २०१३ रोजी दर

 • petrol and diesel prices touches all time high
  मुंबईत पेट्रोल दर 84.07 वर पोहचला आहे. (सांकेतिक फोटो)

  नवी दिल्ली - पेट्रोलचे दर रविवारी विक्रमी वाढले. दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर ७६.२४ रुपयांवर पोहोचले. यापूर्वी १४ सप्टेंबर २०१३ रोजी दर सर्वाधिक म्हणजे ७६.०६ रुपये होता. विशेष म्हणजे तेव्हा क्रूड तेलाचा दर प्रति बॅरल ११२ डॉलर होता. आता तो ८० डॉलरच्या जवळपास आहे. डिझेलचा दर तर रोज प्रचंड वाढत चालला आहे. रविवारी हा दर ६७.५७ रुपये होता.


  रविवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलचा दर ३३ पैसे तर डिझेलचा दर २६ पैशांनी वाढवला. गेल्या वर्षी जूनपासून इंधन तेलाचे दर रोज निश्चित केले जात आहेत. तेव्हापासून झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. त्यापूर्वीच्या काळात दर आठवड्याला इंधन तेलांचे दर निश्चित केले जात होते.
  भारतीय कंपन्या आंतरराष्ट्रीय दरानुसार इंधन तेलाचे दर निश्चित करतात. २४ एप्रिल रोजी पेट्रोलचा निश्चित केलेला दर ७८.८४ डॉलर हाेता. तो आता ७.८% वाढून ८४.९७ डॉलर झाला आहे. यादरम्यान डिझेलचा हाच दर ८४.६८ डॉलरवरून ६.६% वाढून ९०.२८% झाला आहे.

  आठवडाभरात पेट्रोल दरात १.६१ रु. वाढ
  कर्नाटक निवडणुकीचा प्रचार सुरू असताना २४ एप्रिलनंतर १९ दिवस कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले नव्हते. १४ मेपासून दर बदलू लागले तेव्हा आठवडाभरात पेट्रोल १.६१ रुपये तर डिझेल १.६४ रुपयांनी वाढले आहे. दरम्यान, ब्रोकरेज कंपनी कोटक इक्विटीजने गुरुवारी एका अहवालात कंपन्यांनी आपला बुडालेला नफा काढून घ्यायचा ठरवले तर पेट्रोल ४ ते ४.५५ रुपये आणि डिझेल ३.५० ते ४ रुपयांनी महाग होईल, अशी शक्यता वर्तवली होती.

  अबकारी कर कमी करण्याबाबत केंद्रीय सचिवांचे मौन
  शुक्रवारी आर्थिक विषयाच्या विभागाचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कर कमी करण्याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. नोव्हेंबर २०१४पासून जानेवारी २०१६ दरम्यान जेव्हा क्रूड तेलाचे दर कमी होत होते तेव्हा सरकारने ९ वेळा पेट्रोलवर ११.७७ आणि डिझेलवर १३.४७ रुपये अबकारी कर वाढवला होता. मात्र, क्रूड महागल्यानंतर आता फक्त एक वेळा ऑक्टोबर २०१७ मध्ये कर २ रुपये कमी करण्यात आला होता.

  पेट्रोल
  देशाचा विचार करता परभणीत पेट्रोल प्रतिलिटर ८५.७७ रुपये आहे. पणजीमध्ये ते सर्वात स्वस्त ७०.२६ रुपये आहे.


  डिझेल
  हैदराबादेत डिझेल सर्वात महाग म्हणजे प्रतिलिटर ७३.४५ रुपये तर पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त म्हणजे ६३.३५ रुपये आहे.

 • petrol and diesel prices touches all time high
  क्रूडचे दर आंतरराष्‍ट्रीय बाजारात 80 डॉलरच्या पुढे गेले आहेत.

Trending